13 वर्षानंतर घटस्फोट, हृतिक रोशनची एक्स पत्नी म्हणाली, नाही जगू शकत त्याच्याशिवाय आणि..
Sussanne Khan and Hrithik Roshan : बाॅलिवूड अभिनेता हृतिक रोशन याने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. हृतिक रोशनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. हृतिक रोशन हा कायमच त्याच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असतो. हृतिक रोशन हा सध्या सबा आझाद हिला डेट करतोय.

बाॅलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची एक्स पत्नी सुझेन खान यांचे लग्न 2000 मध्ये झाले. मात्र, लग्नाच्या तब्बल 13 वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेत सर्वांनाच मोठा धक्का दिसला. हृतिक रोशन आणि सुझेनच्या घटस्फोटानंतर सर्वचजण हैराण झाले. हृतिक रोशन याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट केले आहेत. हृतिक रोशनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ कायमच शेअर करताना हृतिक रोशन हा दिसतो.
सुझेन खान ही करण जोहर याच्या शोमध्ये पोहचली होती. यावेळीचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. तसा तो व्हिडीओ जुनाच आहे. विशेष म्हणजे सुझेन खान आणि गाैरी खान या एकसोबत पोहचल्या होत्या. यावेळी करण जोहर हा म्हणाला की, तुमच्या दोघींचेही पती बाॅलिवूडचे स्टार अभिनेते आहेत, ते बऱ्याच अभिनेत्रींसोबत काम करतात.
ते इतक्या अभिनेत्रींसोबत काम करतात तर तुम्हाला कधी काही वाटत नाही का? यावर सुझेन खान म्हणते की, मी आणि हृतिक रोशन खूप चांगले मित्र आहोत. हेच नाही तर दिवसभर काय काय झाले हे सर्व मला हृतिक रोशन सांगतो. यामुळे कधी काही वेगळे विचार मनातच आले नाहीत. पुढे सुझेन खान म्हणाली, मी कधीच हृतिक रोशनशिवाय माझ्या आयुष्याचा विचार करू शकत नाही.
हृतिक रोशन आणि सुझेन खान यांचे रिलेशन इतके चांगले असूनही त्यांनी घटस्फोट घेतला. सुझेन खान हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर हृतिक रोशन हा सबा आझाद हिला डेट करतोय. हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या वयामध्ये मोठे अंतर आहे. काही लोक तर हृतिक रोशन आणि सबाच्या जोडीला वडील आणि मुलीची सुंदर जोडी देखील म्हणतात.
मध्यंतरी चर्चा होती की, हृतिक रोशन हा लवकरच सबा आझाद हिच्यासोबत लग्न करणार आहे. हेच नाही तर नेहमीच हृतिक रोशन आणि सबा आझाद हे एकसोबत स्पाॅट होतात. काही दिवसांपूर्वीच विदेशात धमाल करताना दिसले. हृतिक रोशनच्या वाढदिवसाच्या दिवशी सबा आझाद हिने एक अत्यंत खास असा फोटो हा सोशल मीडियावर शेअर केले होता, सोबतच खास कॅप्शनही दिले होते.
