Love Story | बिपाशाशी ब्रेकअपनंतर जिममधल्या मैत्रिणीच्या प्रेमात पडला जॉन अब्राहम, वाचा प्रिया-जॉनची प्रेमकथा

बिपाशा बसूशी ब्रेकअपनंतर जेव्हा अभिनेता जॉन अब्राहमने प्रिया रांचलला डेट केले, तेव्हा लोकांना याबद्दल खबर तर लागली होती, पण त्यांच्या नात्यावर कोणीही भाष्य केले नाही.

Love Story | बिपाशाशी ब्रेकअपनंतर जिममधल्या मैत्रिणीच्या प्रेमात पडला जॉन अब्राहम, वाचा प्रिया-जॉनची प्रेमकथा
जॉन अब्राहम

मुंबई : असे म्हणतात की, जेव्हा माणूस प्रेमात असतो, तेव्हा ते लपत नाही आणि सर्वत्र त्याच्या प्रेमाच्या चर्चा देखील सुरु असतात. मात्र, बॉलिवूडचा देखणा अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) पत्नी प्रियाला डेट करत असताना असे झाले नाही. बिपाशा बसूशी ब्रेकअपनंतर जेव्हा अभिनेता जॉन अब्राहमने प्रिया रांचलला डेट केले, तेव्हा लोकांना याबद्दल खबर तर लागली होती, पण त्यांच्या नात्यावर कोणीही भाष्य केले नाही. जॉन अतिशय सिक्रेटली प्रियाच्या प्रेमात पडला आणि त्यांच्या या नात्याला ‘लग्ना’चे सुंदर नावही दिले (Bollywood actor John Abraham and his wife Priya cute love story).

जॉनने आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट केले. चित्रपटात डॅशिंग भूमिका करणार्‍या जॉनची पत्नी प्रियासोबतची लव्हस्टोरी खूपच रोमांचक आहे. चला तर जाणून घेऊया प्रिया आणि जॉनच्या या रोमँटिक लव्हस्टोरीबद्दल…

बिपाशासोबत असतानाच प्रियाशी ओळख

जॉनची पत्नी प्रिया रांचलशी लव्हस्टोरी कशी सुरू झाली, हे चाहत्यांना फारसे माहिती नाही. जागतिक बँकेत काम केलेल्या प्रिया रुंचलची आणि जॉन अब्राहमची पहिली भेट जिममध्ये झाली होती. दोघांची भेट मुंबईतील एका जिममध्ये झाली होती, जिथे जॉन बिपाशा बसूबरोबर वर्कआऊटसाठी जायचा. पण जिममध्ये जेव्हा ते एकमेकांना भेटले, तेव्हा त्याची प्रियाशी केवळ तोंड ओळख होती.

जिममध्ये झाली पहिली भेट पुढे मैत्रीत बदलली…

जॉन आणि प्रियाची ओळख जिममध्ये झाले आणि मग ते एकमेकांचे चांगले मित्र बनले. असे म्हणतात की, बिपाशासोबत नात्यात असताना प्रियाशी त्याची मैत्री आणखी घट्ट झाली होती. जेव्हा त्याचे बिपाशाशी ब्रेकअप झाले, तेव्हा त्याच्यात आणि प्रियामधली जवळीक अधिक वाढली. बिपाशापासून विभक्त झाल्यानंतर प्रियाला आपली सहचारिणी म्हणून निवडण्यासाठी जॉनला फारसा वेळ लागला नाही (Bollywood actor John Abraham and his wife Priya cute love story).

गुपचूप बांधली लग्नगाठ

प्रिया आणि जॉनच्या अफेअरची चर्चा सुरूच होत होती की, यादरम्यान अभिनेत्याने थेट लग्न करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. जॉन अब्राहमला प्रियाचा साधेपणा आणि समजूतदारपणा खूप आवडला, म्हणूनच त्याने 2014मध्ये प्रियाशी गुपचूप एका खाजगी सोहळ्यात लग्न केले.

बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना जॉनने प्रियाशी लग्न केले होते आणि लग्नाच्या काही दिवस आधी जॉनचा दिग्दर्शक म्हणून ‘विकी डोनर’ हा चित्रपट सुपरहिट होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

जॉनची पत्नी इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळी!

 

View this post on Instagram

 

A post shared by SimplyAmina 🌴 (@simplyaminaxx)

प्रियाबद्दल बोलायचे तर, ती भारतापासून दूर अमेरिकेत राहते. त्यामुळे ती मीडियापासून तशी लांबच असते. जॉनप्रमाणेच प्रियालाही प्रायव्हसी आवडते आणि तिचा हाच स्वभाव तिला जास्त चर्चेत येऊ देत नाही. स्वतः जॉनने एका मुलाखतीत सांगितले होते की, मी पत्नीबरोबर वेळ घालवत असताना आजूबाजूला पापाराझी आणि त्यांचे कॅमेरे असलेले आम्हाला आवडत नाही. मला आणि प्रिया दोघांनाही प्रायव्हसी आवडते.

अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँकर प्रिया रुंचल अमेरिकन नागरिकत्व धारण करतात आणि सामान्यत: भारतीय चित्रपटसृष्टीतल्या गप्पांपासून दूर राहतात. जॉन अब्राहम एकदा पत्नी प्रियाच्या चर्चेपासून दूर राहण्याविषयी म्हणाले होते, ‘जेव्हा मी पत्नीबरोबर वेळ घालवत असतो तेव्हा मला पापाराझी आवडत नाही. विशेषत: जेव्हा मी माझ्या पत्नीबरोबर दर्जेदार वेळ घालवितो. प्रियाला गोपनीयता आवडते.

(Bollywood actor John Abraham and his wife Priya cute love story)

हेही वाचा :

Video | ‘शेरनी’मध्ये विद्या बालन दिसणार धडाकेबाज वन अधिकाऱ्याच्या भूमिकेत, पाहा जबरदस्त टीझर

PHOTO | ‘मराठी रंगभूमीने प्रेक्षकांचं प्रेम तर दिलच पण अनेक आनंदाचे क्षणही दिले’, प्रशांत दामलेंनी शेअर केले खास फोटो!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI