Satyameva Jayate 2 |ॲक्शन सीन दरम्यान जॉन अब्राहमला दुखापत, चित्रपटाचे शूटिंग थांबवले!

अभिनेता जॉन अब्राहम उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी ‘सत्यमेव जयते 2’ या त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करण्यात व्यस्त आहे.

Satyameva Jayate 2 |ॲक्शन सीन दरम्यान जॉन अब्राहमला दुखापत, चित्रपटाचे शूटिंग थांबवले!

मुंबई : अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी ‘सत्यमेव जयते 2’ (Satyameva Jayate 2) या त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करण्यात व्यस्त आहे. लखनौमधील शूटिंग पूर्ण झाल्यानंतर जॉन अब्राहम ‘सत्यमेव जयते 2’ च्या टीमसह काही दिवसांच्या शूटसाठी वाराणसीत आहे. पण तिथल्या शूटिंगदरम्यान तो जखमी झाला आहे. अ‍ॅक्शन सीन शूट करताना त्याला दुखापत झाली आहे. ज्यामुळे शूटिंग मध्येच थांबवावे लागले. (John Abraham was injured during the action scene in Satyamev Jayate 2 movie)

शूटच्या पहिल्याच दिवशी जॉन अब्राहमला दुखापत झाल्याने त्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं असं सांगितले जात आहे. रुग्णालयात प्रथमोपचार दिल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. ऑनलाइन मीडिया रिपोर्टनुसार जॉन अब्राहमला चेत सिंह किल्ल्याजवळ शूटिंग दरम्यान दुखापत झाली होती. त्याला रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर ही बातमी परिसरात वाऱ्या सारखी सर्वत्र पसरली.

त्यानंतर जॉन अब्राहमला पाहण्यासाठी लोकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. लोकांच्या गर्दीपासून जॉन अब्राहमला रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले. चित्रपट निर्मात्यांनी वाराणसीमध्ये चार दिवसाचे वेळापत्रक निश्चित केले आहे.या चित्रपटात जॉन अब्राहम अगदी वेगळ्या लूकमध्ये दिसला आहे. यात त्याने भगतसिंग स्टाईलचा लूक दिला आहे. चित्रपटाच्या समोर आलेल्या पोस्टमध्ये त्याने खांद्यावर नांगर धरला आहे. त्याच्या शरीरावर अनेक जखमा देखील दिसत आहेत.

जॉन अब्राहम व्यतिरिक्त, सत्यमेव जयते 2 मध्ये दिव्या खोसला कुमार, मनोज बाजपेयी, अनूप सोनी, हर्ष छाया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मिलाप जावेरी दिग्दर्शित या चित्रपटाचे भूषण कुमार, कृष्णा कुमार आणि निखिल अडवाणी यांनी सह-निर्मिते आहेत. हा चित्रपट सत्यमेव जयतेचा पुढचा भाग आहे जो 2018 मध्ये रिलीज झाला होता. सत्यमेव जयते 2 हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या : 

Shahid Kapoor | धर्मा प्रॉडक्शनच्या बिग बजेट चित्रपटातून शाहिद कपूर आऊट! वाचा काय घडलं..

Coolie No. 1 |’कुली नंबर. 1′ चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अगोदरच चर्चेत!

(John Abraham was injured during the action scene in Satyamev Jayate 2 movie)

Published On - 9:54 am, Fri, 25 December 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI