भाऊच्या धक्क्यात रितेश देशमुखने निकी तांबोळीची जिरवली, बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच…
बिग बॉस मराठी सीजन 5 धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या सीजनबद्दल प्रेक्षकांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळतंय. अनेक दिग्गज कलाकार या शोमध्ये सहभागी झाले आहेत. नुकताच बिग बॉसच्या घरात भाऊचा धक्का झालाय. यावेळी रितेश देशमुखने एक अत्यंत मोठी शिक्षा निकी तांबोळीला सुनावली आहे.
बिग बॉस मराठी सीनज 5 धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहे. बिग बॉसच्या निर्मात्यांकडून घरातील सदस्यांसाठी खास टास्क दिले जात आहेत. या सीजनबद्दल एक वेगळीच क्रेझ ही चाहत्यांमध्ये बघायला मिळतंय. हे सीजन धमाका करणार असल्याचे सांगितले जातंय. बिग बॉसच्या घरात या आठवड्यात घनश्याम दरोडे ऊर्फ छोटा पुढारी हा नॉमिनेशनमध्ये होता. कमी मत मिळाल्याने घनश्याम हा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलाय. जे घरातील सदस्यांसाठी देखील हैराण करणारी नक्कीच होते. घनश्याम दरोडे हा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडत असताना अरबाज पटेल हा ढसाढसा रडताना देखील दिसला.
दुसरीकडे भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश देशमुख याने निकी तांबोळी हिचा जोरदार क्लास लावल्याचे बघायला मिळाले. निकी तांबोळीला अत्यंत मोठी शिक्षा सुनावण्यात आलीये. बिग बॉसच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारची शिक्षा स्पर्धकाला सुनावण्यात आलीये. आता निकी तांबोळी ही बिग बॉसच्या घरात असूपर्यंत तिला कधीच कॅप्टन होता देणार नाहीये. रितेश देशमुख याने ही शिक्षा निकी तांबोळी हिला सुनावली आहे.
फक्त हेच नाही तर रितेश देशमुख म्हणाला की, बिग बॉस बघण्यास सुरूवात केली की, निकीचा तो कर्णकश आवाज येतो. निकी तुझ्या त्या कर्णकश आवाजाने टीव्हीच बंद करावी लागते. काहीही कारण नसताना तू घरात वाद करत असल्याचे रितेश देशमुख याने म्हटले. रितेश देशमुख याने भाऊच्या धक्क्यामध्ये अनेक गोष्टी निकी तांबोळी हिला सुनावल्या आहेत.
हेच नाही तर यावेळी रितेश देशमुख हा अरबाज पटेल याला म्हणाला की, तू निकीच्या चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करतो. ज्यावेळी ती इतरांना भांडते त्यावेळी तू सर्व पाहून फक्त हसतो. तू निकीला कधीच बोलत नाही की ती चुकीची आहे. यावेळी अरबाज खान याच्यावर ओरडताना देखील रितेश देशमुख हा दिसला होता. आर्या हिने निकीच्या बेडवर भांडे ठेवले होते, त्यावरच वाद निर्माण झाला होता.
हेच नाही तर आर्या ही चक्क घरातील भांडे लपवताना देखील दिसली होती. ज्यानंतर वैभव आणि आर्या यांच्यामध्येच वाद बघायला मिळाला. बिग बॉसच्या घरात नवीन स्पर्धेक सहभागी होणार असल्याची एक जोरदार चर्चा सुरूआहे. मात्र, तो स्पर्धेक नक्की कोण याबद्दल अजून तसा काही खुलासा हा होऊ शकला नाहीये. बिग बॉसच्या वर्षा उसगांवकर या देखील धमाकेदार गेम खेळताना दिसत आहेत.