AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Shivaji: मुंबईत ‘राजा शिवाजी’ सिनेमाचे शो अचानक रद्द, प्रेक्षकांची निराशा, नेमकं झालं तरी काय?

Raja Shivaji: बॉक्स ऑफिस बक्कळ कमाई करत असताना 'राजा शिवाजी' सिनेमाचे मुंबईत शो अचानक रद्द करण्यात आले... ज्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली... तर जाणून घ्या नेमकं काय घडलं...

Raja Shivaji: मुंबईत 'राजा शिवाजी' सिनेमाचे शो अचानक रद्द, प्रेक्षकांची निराशा, नेमकं झालं तरी काय?
राजा शिवाजी सिनेमा
| Updated on: May 04, 2026 | 10:57 AM
Share

Raja Shivaji: अभिनेता रितेश देशमुख, अभिनेता सलमान खान स्टारर ‘राजा शिवाजी’ सिनेमाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. 1 मे रोजी प्रदर्शित झलेला सिनेमा बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई करत आहे. सांगायचं झालं तर, पहिल्याच दिवशी सिनेमाने मोठा विक्रम रचला. हिंदी भाषेच्या तुलनेत मराठी बॉक्स ऑफिसवर सिनेमाने चांगली कामाई केली. सांगायचं झालं तर, ‘राजा शिवाजी’ सिनेमाने ओपिनिंग डेला सर्वाधिक कलेक्शन असणारा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिनेमाची चर्चा सुरु असताना, शनिवार आणि रविवारी सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची पाऊलं चित्रपटगृहांकडे देखील वळली. पण चित्रपटगृहांकडे पोहोचल्यानंतर कळलं की, सिनेमाचे शो रद्द करण्यात आले. ज्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस असल्याने अनेक जण ‘राजा शिवाजी’ सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहात आले. पण प्रेक्षकांची निराशा झाली. कारण सिनेमाचे अनेक शो रद्द करण्यात आली… मुंबईतील भारत माता टॉकीजमधील शो रद्द करण्यात आला आहे. याबाबत प्रेक्षकांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रेक्षकांनी सांगितल्यानुसार, शनिवारी रात्रीच रविवारी सकाळच्या शोसाठी बुक माय शो वरून तिकिटं बुक केली होती. जवळपास 15 मिनिटांपूर्वी प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर जमले. पण शो रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली. याबद्दल व्यवस्थापकांना याबद्दल विचारलं त्यांनी शो रद्द झाला आणि याबद्दल बुक माय शोला सुद्धा कळवलं…. एवढंच सांगितलं.

तर चित्रपटगृहाच्या क्लस्टर मॅनेजरशी संपर्क साधला असता, त्यानी तांत्रिक कारण दिलं… डिस्ट्रीब्यूटर संबंधी काही अडचणी निर्माण झाल्याने शो रद्द करावा लागला… यासंबंधी बूक माय शोला कळवण्यात आलं होतं. त्यांनी पुढे प्रेक्षकांना संबंधित माहिती देणं अपेक्षित होतं… पण त्यांनी कळवलं नाही. त्यामुळे गोंधळ झाला… असं देखील क्लस्टर मॅनेजर म्हणाले. अशात शो रद्द झाल्यानंतर प्रेक्षकांची निराशा झाली आणि तिकिटांचे पैसे परत मिळणार का? असा प्रश्न देखील प्रेक्षकांना पडला आहे.

‘राजा शिवाजी’ सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘राजा शिवाजी’ने हिंदीमध्ये प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी 4.25 कोटी रुपये कमावले आहेत. तर मराठी भाषेत 7.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. सिनेमाच्या आतापर्यंतच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, आतापर्यंत सिनेमाची एकूण कमाई 40.34 कोटी रुपये झाली आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी