शाहरुख खान सिनेमाच्या सेटवर जखमी… मोठा ट्विस्ट काय? खरी अपडेट समोर
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखला गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचारासाठी अमेरिकेला घेऊन जाण्यात आले. पण आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख हा ‘किंग’ सिनेमाचे चित्रीकरण करत असताना गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला उपचारासाठी तातडीने अमेरिकेला घेऊन जाण्यात आले. त्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. शाहरुख खानला चित्रपटाच्या सेटवर कोणतीही दुखापत झालेली नाही. मग नेमकं काय झालं जाणून घेऊया…
एका अहवालानुसार, शाहरुख खानला चित्रपटाच्या सेटवर कोणतीही दुखापत झालेली नाही. त्याच्या जुन्या दुखापतींमुळे काहीवेळा त्याला वेदना होतात. त्यामुळे त्याला उपचारासाठी अमेरिकेला जावे लागते. आता अभिनेता या जुन्या दुखापतींच्या उपचारासाठीच अमेरिकेला गेला होता. शाहरुखच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, ‘किंग’च्या सेटवर त्याला पाठीला दुखापत झाल्याची अफवा पूर्णपणे ‘खोटी’ आहे आणि तो पूर्णपणे ठीक आहे.
वाचा: ज्याला हिंदी शिकायची त्याने जरुर शिका, पण…; स्वप्नील जोशीने मांडलं परखड मत
‘किंग’मध्ये शाहरुख खानसोबत दिसणार हे स्टार्स!
शाहरुख खानच्या ‘किंग’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटात तो प्रथमच आपली लाडकी मुलगी सुहाना खानसोबत पडद्यावर दिसणार आहे. अहवालानुसार, या चित्रपटात शाहरुखसोबत अभिषेक बच्चन, दीपिका पादुकोण, अनिल कपूर, राणी मुखर्जी, जॅकी श्रॉफ, अरशद वारसी, राघव ज्युअल यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
शाहरुख शेवटचा या चित्रपटात दिसला होता
शाहरुख खान यापूर्वी ‘डंकी’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत तापसी पन्नू आणि विक्की कौशल यांनी भूमिका केल्या होत्या. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. तर सुहाना खान ‘द आर्चीज’ चित्रपटात दिसली होती. हा तिचा पदार्पण चित्रपट होता, ज्यामध्ये तिच्यासोबत अगस्त्य नंदा, वेदांग रैना आणि खुशी कपूर यांनीही अभिनयात पदार्पण केले होते. आता सर्वांना किंग चित्रपटाची आतुरता आहे.
