AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुख खानने जवळच्या मित्राच्या लगावली कानशिलात, 150 कोटींच्या नुकसानाची उडवली होती खिल्ली

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने एका पार्टीमध्ये चक्क बेस्ट फ्रेंडच्या नवऱ्याच्या कानशिलात लगावली होती.

शाहरुख खानने जवळच्या मित्राच्या लगावली कानशिलात, 150 कोटींच्या नुकसानाची उडवली होती खिल्ली
Shahrukh KhanImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 24, 2025 | 5:19 PM
Share

बॉलिवूडचा बादशाह म्हणून अभिनेता शाहरुख खान ओळखला जातो. तो फिल्मी इंडस्ट्रीमधील मोठे नाव आहे आणि त्याचा चाहता वर्ग जगभरात पसरला आहे. तो असा स्टार आहे, ज्याच्याबद्दल फार कमी वाईट बातम्या येतात. इंडस्ट्रीतल्या लोकांशी त्याचे रिलेशनही बऱ्यापैकी चांगले आहेत. पण एकदा तो चर्चेत आला, जेव्हा त्याने आपल्या बेस्ट फ्रेंडच्या नवऱ्याला एका पार्टीत सगळ्यांसमोर थोबाडीत मारली होती.

शाहरुखचे अनेकांशी चांगले संबंध आहेत, त्यातली एक आहे फिल्ममेकर आणि कोरिओग्राफर फराह खान. फराहसोबत शाहरुखने काही मस्त सिनेमे केले आहेत. त्यांचे बॉन्डिंग देखील चांगले असल्याचे सगळ्यांना दिसते. पण एकदा त्याने फराहचा नवरा शिरीष कुंदरच्या कानशिलात लगावली होती. शिरीषने एडिटर म्हणून इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली होती. पण त्याचं आणि शाहरुखचं नातं बऱ्याच काळापासून चांगलं नव्हतं. वाचा: पाकिस्तानमधून पळून आला अन् बनला बॉलिवूडचा सुपरस्टार, आता ऑपरशेन सिंदूरचं केलं कौतुक

सिनेमाची ऑफर दिली होती

खरं तर, शाहरुख आणि शिरीष यांच्यातला वाद एका सिनेमामुळे सुरु झाला होता. शिरीषने शाहरुखला एक सिनेमा ऑफर केला होता. पण जेव्हा शाहरुखने स्क्रिप्ट वाचली, तेव्हा त्याला ती फारशी आवडली नाही. मग शाहरुखने शिरीषला स्क्रिप्टमध्ये बदल करायला सांगितलं. पण इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, यात बराच वेळ गेला आणि शेवटी शिरीषने शाहरुखच्या जागी अक्षय कुमारला घेतलं आणि ‘तीस मार खां’ बनवला.

‘रा वन’वर केलं होतं कमेंट

नंतर शाहरुख ‘रा वन’ सिनेमात दिसला. पण तो रिलीज होण्याआधीच शिरीषने त्यावर ट्वीट्स सुरू केले. त्याने लिहिलं होतं की, ‘रा वन’ सगळं काही करू शकतो, फक्त फॅन्सचं मनोरंजन करू शकत नाही. दुसऱ्या पोस्टमध्ये त्याने सिनेमाच्या बजेटवर बोलताना लिहिलं, “१५० कोटींचा फटाका… फुस्स.” या सगळ्या निगेटिव्ह ट्वीट्सवर शाहरुखने काहीच रिअॅक्शन दिली नव्हती.

पार्टीत मारली कानाखाली

शिरीष आणि शाहरुखची भेट संजय दत्तच्या ‘अग्निपथ’ सिनेमाच्या सक्सेस पार्टीत पुन्हा झाली होती. असं सांगितलं जातं की, तिथेही शिरीषने ‘रा वन’वर बरंच काही बोलायला सुरुवात केली. मग शाहरुखचा पारा चढला आणि त्याने सगळ्यांसमोर शिरीषला थोबाडीत मारली. फराहने या सगळ्याला चुकीचं ठरवलं. पण शिरीष म्हणाला की, त्याला फक्त थप्पड नाही, तर मुक्केही पडले. पण काही वेळाने शिरीषने आपल्या कमेंट्ससाठी शाहरुखची माफी मागितली होती.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.