
Salman Khan : अभिनेता सलमान खान याचे बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींसोबत वैर आहे. अनेकांनी सलमान खान विरोधात आवाज देखील उठवला आहे. यामध्ये अभिनेता शक्ती कपूर यांचं देखील नाव आहे. एक काळ असा होता जेव्हा सलमान खान आणि शक्ती कपूर यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. ‘जुडवा’, ‘चल मेरे भाई’, ‘हम साथ साथ है’ आणि ‘हॅलो ब्रदर’ यासिनेमांमध्ये सलमान खान आणि शक्ती कपूर यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. पण दोघांच्या नात्यात दरी तेव्हा निर्माण झाली जेव्हा शक्ती कपूर याचं काळ सत्य सर्वांसमोर आलं. त्या वेळी एका स्टिंग ऑपरेशनमध्ये असं उघड झालं की, शक्ती कपूर याने उभरती अभिनेत्री म्हणून स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या एका गुप्त पत्रकाराकडून शारीरिक सुखाची मागणी केली. या घटनेनंतर शक्ती कपूर आणि सलमान खान एकत्र काम करणं बंद केलं.
दोघांमध्ये वाद आहेत, हे सर्वांना माहिती होतं. पण 2011 मध्ये ते स्पष्ट झालं. जेव्हा 73 वर्षीय शक्ती कपूर याने ‘बिग बॉस 5’ मध्ये भाग घेतला होता.. जो सलमान खान आणि संजय दत्त यांनी होस्ट केलेला… शो दरम्यान, सलमान, शक्ती कपूर याच्याकडे दुर्लक्ष करून इतर स्पर्धकांचं स्वागत करताना दिसला. त्यानंतर सलमान खान याने सर्वांसमोर शक्ती कपूर यांच्यावर टीका केल्यानंतर प्रकरण आणखी टोकाला पोहचलं… त्यानंतर शक्ती कपूर सर्वांसमोर सलमान खानला म्हणाला, ‘महिलांना मारहाण करणारा…’
आता जवळपास 15 वर्षांनंतर शक्ती कपूर याने सलमान खान आणि घडलेल्या प्रकरणावर मोठं वक्तव्य केलं आहे. दोघांमधील संबंध आता चांगले आहेत.. असं शक्ती कपूर म्हणला.. ‘आमच्यामध्ये चांगले संबंध आहेत आणि माझी कोणाविरुद्धही तक्रार नाही.’ असं देखील अभिनेता म्हणाला.
स्वतःच्या दारु पिण्याच्या सवयीबद्दल देखील अभिनेत्याने मोठं वक्तव्य केलं. ‘दारू सोडून मला पाच वर्षे झाली आहेत. आता मी इंडस्ट्रीतील दारुडा नाही. त्यापैकी बहुतेक जण आरोग्याबाबत जागरूक आहेत. शक्ती कपूरने यापूर्वीच खुलासा केला होता की शोमध्ये सहभागी होण्याचा त्यांचा निर्णय ट्रॉफी जिंकण्यासाठी नव्हता.’ तो म्हणाला की तो दारूपासून दूर राहू शकतो आणि शिस्तबद्ध जीवन जगू शकतो हे त्याच्या मुलांना सिद्ध करण्यासाठी तो या रिअॅलिटी शोमध्ये सामील झालेला.