AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Singh Rajput case | सीबीआयची टीम अ‍ॅक्शन मोडमध्ये, मुंबई पोलिसांकडून डायरी, मोबाईल, लॅपटॉप सुपूर्द

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआय टीम अ‍ॅक्शन मोडमध्ये आली (Sushant Singh Rajput Suicide CBI Investigation Live Update) आहे.

Sushant Singh Rajput case | सीबीआयची टीम अ‍ॅक्शन मोडमध्ये, मुंबई पोलिसांकडून डायरी, मोबाईल, लॅपटॉप सुपूर्द
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी कूपर हॉस्पिटलच्या डॉक्टर्स टीमला सुशांतच्या आत्महत्येच्या टायमिंगवरून शंका विचारली होती. ज्यांनी सुशांतच्या मृतदेहाची ऑटोप्सी केली होती त्यांना याबद्दल विचारणा करण्यात आली होती. यात 5 ऑगस्टला मुंबई पोलिसांना डॉक्टरांचा रिपोर्ट मिळाला होता.
| Updated on: Aug 23, 2020 | 8:57 PM
Share

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आलेली सीबीआय टीम तात्काळ अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. सुशांतचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्याची हत्या झाली का, सुशांतच्या मृत्यूमुळे रियाला किंवा इतर कोणाला काय फायदा? या सर्व प्रश्नांचा तपास आज (21 ऑगस्ट) सीबीआयची टीम करणार आहे. (Sushant Singh Rajput Suicide CBI Investigation Live Update)

सीबीआयच्या दोन टीमकडून विभागणी करुन चौकशी

या पार्श्वभूमीवर सीबीआयने दोन टीममध्ये विभागणी केली आहे. यातील एक टीमने वांद्रे पोलीस ठाण्यातून चौकशीसाठी दाखल झाली आहे. त्यांनी सुशांतची डायरी आणि इतर दस्तावेज ताब्यात घेतले आहे. तसेच सुशांतचा फोन आणि लॅपटॉपही ताब्यात घेतले आहेत. यातील एक टीम ही एसपी अनिल यादव लीड करत असून वांद्रे पोलीस ठाण्यात तपास करत आहे. तर दुसरी टीम ही एसपी नुपूर यादव लीड करत आहे. ही टीम फॉरेन्सिक विश्लेषण करणार आहे.

त्याशिवाय सीबीआयच्या टीमने सुशांतच्या मृत्यूदिवशी घटनास्थळी उपस्थिती असलेल्या सर्व साक्षीदारांना बोलवलं आहे. तसेच सुशांतच्या रुमचा दरवाजा उघणाऱ्या व्यक्तीलाही बोलवण्यात आले आहे.

हेही वाचा : प्रख्यात दिग्दर्शक महेश भट्ट आणि रिया चक्रवर्तीचे ‘कथित’ व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

सद्यस्थितीत सीबीआय टीम शवविच्छेदन अहवालाचा अभ्यास करत आहे. सुशांत मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी 50 हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत. हे दस्तावेज सीबीआयच्या टीमकडे देण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाचा तपास करणाऱ्या डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांचीही सीबीआयची टीम भेट घेणार आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर अभिषेक त्रिमुखे आणि रिया चकवर्ती या दोघांनी वारंवार फोनवर चर्चा केली आहे.

परमजीत सिंह दहिया यांची चौकशी होण्याची शक्यता?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्र्याचे डीसीपी परमजीत सिंह दहिया यांचाही जबाब नोंदवणार आहे. सुशांतचा मेहुण्याने माझ्या जीवाला धोका आहे, असे डीसीपी परमजीत सिंह दहिया यांना सांगितले होते. त्यांच्या मेहुण्याने रियाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासही सांगितले आहे. त्यामुळे त्यांचीही चौकशी केली जाणार आहे.

सुशातंचा मित्र संदिप सिंहचीही चौकशी?

सुशांत सिंह राजपूतच्या तपासात सुशांतचा मित्र म्हणवणारा संदिप सिंह याचीही चौकशी सीबीआय करणार आहे. संदिप सिंह हा 14 जूनला पोस्टमार्टेम रुम आणि कूपर रुग्णालयात नितू लिंहसोबत वारंवार गेला होता. नितू लिंह सोबत त्याने फोटोही काढला होता. सुशांतचा तो जवळचा मित्र असल्याचं त्याने कुटुंबियांना सांगितलं होतं. त्याची दिनचर्या काय होती, तो सुशांतला कधीपासून ओळखतो, त्याच्यासोबत झालेले चॅट, त्याचे इतरांशी झालेल्या चॅट्सची, कॉल्सची चौकशी होणार आहे.  संदिप सिंह याचा सुशांत आत्महत्या प्रकरणात वापर झालाय का?, त्याने काही फाऊल प्ले केला आहे का याची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सीबीआय क्राईम सीन रिक्रिएट करणार

तसेच सुशांतच्या वजनाचा डमी पुतळा घरात फासावर लटकवून सीबीआय क्राईम सीन रिक्रिएट करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

सीलिंग फॅन आणि बेडमध्ये नेमकं अंतर किती आहे? सहा फूट उंचीच्या सुशांतचे पाय फासावर लटकताना बेडवर होते, की खाली याची सीबीआय खातरजमा करणार आहे. सीबीआयची टीम आज सुशांतच्या घरी क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी येणार असल्याची माहिती आहे.

फॉरेंसिक टीम सीबीआयसोबत असेल. पोस्टमार्टेम, विसेरा, घरात उपस्थित असलेले चार साक्षीदार या सगळ्यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील ऊलवे इथे असलेल्या सुशांत सिंह याच्या ऑफिसलाही सीबीआय टीम भेट देणार आहे. (Sushant Singh Rajput Suicide CBI Investigation Live Update)

संबंधित बातम्या : 

सुशांतच्या वजनाचा डमी पुतळा फासावर, सीबीआय क्राईम सीन रिक्रिएट करणार

SSR Death Case | सीबीआय मुंबई पोलिसांच्या संपर्कात, समन्वयासाठी नोडल अधिकारी नियुक्त

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.