ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांच्या लग्नानंतर बच्चन कुटुंबियांच्या समस्यांमध्ये मोठी वाढ, थेट खुलासा, अमिताभ यांनाच..
Aishwarya Rai and Abhishek Bachchan Marriage : ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे ऐश्वर्या रायची कोट्यवधीची संपत्ती देखील आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात वाद सुरू असल्याचे काही दिवसांपासून सतत सांगितले जातंय.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न सर्वाधिक चर्चेत असणारे एक लग्न आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याचे लग्न 2007 मध्ये झाले. हे लग्न अत्यंत खास पद्धतीने पार पडले. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लेकाच्या लग्नाची जोरदार तयारी देखील बघायला मिळाली होती. ऐश्वर्या राय ही देखील त्यावेळी बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. या लग्नाकडे संपूर्ण मीडियाच्या नजरा होत्या. मात्र, यावेळी असे काही घडले की, बच्चन कुटुंबाच्या अडचणीत मोठी वाढ झाली.
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बॉलिवूड पापाराझी वरिंदर चावला यांनी अत्यंत मोठा खुलासा केलाय. वरिंदर चावला यांनी म्हटले की, बच्चन कुटुंबाकडून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाचे आमंत्रण पापाराझी यांना देण्यात आले नव्हते. हेच नाही तर त्यांनी रस्ते देखील कव्हर करून घेतले होते. मी त्यावेळी त्यांच्या घराबाहेर होतो.
आम्हाला हे माहिती होते की, फोटो नेमके कुठून घ्यायचे. मात्र, त्यावेळी पापाराझींना येण्यापासून रोखण्यासाठी तिथेच बस उभी करण्यात आली. त्यावेळी पापाराझी यांना अत्यंत वाईट वागणूक देण्यात आली. अनेक पापाराझी देखील जखमी झाले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नानंतर पापाराझी हे बच्चन कुटुंबियांवर प्रचंड नाराज झाले.
बच्चन कुटुंबाचा निषेध करण्यासाठी पापाराझी यांनी थेट बच्चन कुटुंबियांचे फोटो क्लिक करणेच बंद केले. बच्चन कुटुंबापैकी कोणी कोणत्याही पुरस्कार सोहळ्यात किंवा कार्यक्रमात दिसले तरीही पापाराझी यांच्याकडून कॅमेरे खाली केले जात असत. काहीही झाले तरीही बच्चन कुटुंबियापैकी कोणाचेही फोटो काढले जात नव्हते. एकप्रकारे पापाराझी निषेध करत होते.
यासर्व प्रकारानंतर अमिताभ बच्चन यांनी पापाराझी यांच्यासोबत गुप्त बैठक घेतली. त्यानंतर पापाराझी यांनी बच्चन कुटुंबियांचे फोटो काढण्यास सुरूवात केली. बरेच दिवस पापाराझी यांच्याकडून बच्चन कुटुंबाचा निषेध करण्यात आला. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे सध्या त्यांच्या नात्यामुळे जोरदार चर्चेत आहेत. सतत एक चर्चा रंगताना दिसत आहे की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात वाद सुरू आहे.
