ऐश्वर्या राय कधीच विसरु शकत नाही आयुष्यातील ‘ते’ दिवस, एका व्हिडीओतून सर्वकाही समोर
Aishwarya Rai Journey | ऐश्वर्या राय हिचा 'तो' व्हिडीओ पाहिल्यानंतर व्हाल अवाक्..., खुद्द ऐश्वर्या कधीच विसरु शकत नाही आयुष्यातील 'ते' दिवस..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय हिच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा..., चाहत्यांमध्ये देखील व्हिडीओची चर्चा...

बॉलिवूडमध्ये आताच्या घडीला अनेक अभिनेत्री चाहत्यांच्या मनावर आणि मोठ्या पडद्यावर राज्य करत आहेत. पण जेव्हा अभिनेत्रींच्या सौंदर्याचा विषय रंगतो, तेव्हा अव्वल स्थानी अभिनेत्री ऐश्वर्या राय असते. आज ऐश्वर्या बॉलिवूडपासून दूर आहे. पण तिच्या चाहत्यांची संख्या अद्यापही कमी झालीले नाही. ऐश्वर्या हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता देखील अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तम्ही ऐश्वर्या हिचा 30 वर्षांचा प्रवास एका व्हिडीओमध्ये पाहू शकता.
बॉलिवूडमधील ऐश्वर्या राय हिचा प्रवास खूप मोठा आहे. कॉलेजमधील शोपासून ते मॉडेलिंगपर्यंत आणि मिस वर्ल्डचा ताज आणि फिल्मी दुनियेतील सुपरहिट सिनेमांपर्यंत… ऐश्वर्या हिने प्रत्येक टप्प्यात यश मिळवलं आहे. नुकताच, कान्समध्ये देखील ऐशच्या लूकची बरीच चर्चा झाली होती.
View this post on Instagram
ऐश्वर्या राय हिच्या करिअरचा प्रवास दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऐश्वर्या हिच्या इन्स्टाग्राम फॅनपेजवरून व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सुरुवातील ऐश्वर्या कॉलेजमध्ये वॉक करताना दिसत आहे. त्यानंतर अभिनेत्रीने मिस वर्ल्डचा किताब स्वतःच्या नाववावर केला.
मिस वर्ल्ड जिंकल्यानंतर ऐश्वर्या हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अभिनेत्रीने तामिळ ‘इरुवर’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने मागे वळून पाहिलं नाही. अभिनेता सलमान खान याच्यासोबत स्क्रिन शेअर केल्यानंतर सर्वत्र ऐश्वर्याची चर्चा रंगली.
‘हम दिल दे चुके समन’ सिनेमानंतर ऐश्वर्या हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली. देवदास, ताल, मोहब्बतें, धूम 2, जोधा अकबर, सरबजीत, रावण, गुरु, हमारा दिल आपके पास है आणि पोन्नियन सेल्वम यांसारख्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केलं.
सांगायचं झालं तर, ऐश्वर्या फक्त स्वतःच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिली. सलमान खान याच्यासोबत अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.
सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या हिने 2007 मध्ये अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर ऐश्वर्या हिने 2011 मध्ये लेक आराध्या हिला जन्म दिला. आता सोशल मीडियावर ऐश्वर्या कायम सक्रिय असते. अभिनेत्री कायम आराध्या हिच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
