क्रिकेटर शुभमन गिलच्या प्रेमात ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री?, थेट म्हणाली, आम्ही दोघे…
Ananya Pandey and Shubman Gill : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. अनन्या पांडे हिचे चित्रपट एका मागून एक प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. मात्र, अभिनेत्रींच्या चित्रपटांना म्हणावा तसा धमाका करण्यात यश मिळत नाहीये. खासगी आयुष्यामुळेही अनन्या पांडे चर्चेत आलीये.

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे एक नाव आहे. अनन्या पांडेची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अनन्या पांडे सोशल मीडियावरही सक्रिय आहे. आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना अनन्या पांडे दिसत आहे. अनन्या पांडे ही सध्या फक्त तिच्या चित्रपटांमुळेच नाही तर खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. अनन्या पांडे ही गेल्या काही वर्षांपासून आदित्य रॉय कपूर याला डेट करत होती. यांचे विदेशातील रोमांटिक फोटोही व्हायरल होताना दिसले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून यांच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. अनन्या पांडे हिच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर आदित्य रॉय कपूर हा डेटिंग अॅपवर देखील दिसलाय.
अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या ब्रेकअपनंतर अनन्या पांडे हिचे नाव थेट हार्दिक पांड्या याच्यासोबत जोडले गेले. अनन्या पांडे आणि हार्दिक पांड्या यांचे डान्स करतानाचे काही खास फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले. अनंत अंबानीच्या लग्नात धमाल करताना अनन्या पांडे आणि हार्दिक हे दिसले. मात्र, आता दुसऱ्याच एका क्रिकेटरसोबत अनन्या पांडेचे नाव जोडले जात आहे.
अनन्या पांडे आणि शुभमन गिल यांनी काही दिवसांपूर्वीच एक जाहिरात एकत्र केलीये. नुकताच एका मुलाखतीमध्ये चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना अनन्या पांडेने मोठा खुलासा केला. अनन्या पांडेला चाहत्याने कमेंट करत म्हटले होते की, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची पहिली भेट ही एका जाहिरातीच्या शूटवेळी झाली होती आणि त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले
विराट आणि अनुष्काप्रमाणेच तुझे आणि शुभमनचे होऊ शकते का रिलेशन? यावर अनन्या पांडे ही म्हणाली की, मुळात म्हणजे आम्ही खूप वेगळे आहोत. मी आणि शुभमन कधीच रिलेशनमध्ये येऊ शकत नाहीत. आम्ही फक्त त्या जाहिरातीसाठीच भेटलो होतो. त्यानंतर आमच्यात काही भाष्य झाले नाही किंवा आम्ही कधी बोलतही नाहीत.
गेल्या काही दिवसांपासून सतत शुभमन गिल याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले जात आहे. मात्र, शुभमन गिल हा नेमका कोणाला डेट करत आहे हे अजून कळू शकले नाहीये. एका टीव्ही अभिनेत्रीसोबत देखील शुभमन गिलचे नाव जोडले जात आहे. त्यामध्येच अनन्या पांडे आणि शुभमन गिल यांचे जाहिरात शूटवेळीचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.
