AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर त्या वादावर दीपिका पादुकोण हिने सोडले माैन, चक्क रणवीर सिंहला सोडून या अभिनेत्याच्या हातात हात घालून फोटो शेअर करत म्हणाली…

Deepika Padukone big statement : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अभिनेत्रीने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये बॉलिवूडचा अनेक हीट चित्रपट दिली आहेत. आता मुलीच्या जन्मानंतर अभिनेत्री परत एकदा शूटिंगवर परतलीये.

अखेर त्या वादावर दीपिका पादुकोण हिने सोडले माैन, चक्क रणवीर सिंहला सोडून या अभिनेत्याच्या हातात हात घालून फोटो शेअर करत म्हणाली...
Deepika Padukone
| Updated on: Sep 20, 2025 | 1:10 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. दीपिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर अभिनेत्री काही काळ मोठ्या पडद्यापासून दूर होती. मात्र, तिने परत एकदा चित्रपटांच्या शूटिंगला सुरूवात केलीये. यादरम्यान दीपिका पादुकोणला अत्यंत मोठा झटका ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिला. थेट अभिनेत्रीला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या वादावर अभिनेत्री माैन सोडले असून निर्मात्यांना चांगलेच फटकारले. दीपिकाने अभिनेता शाहरूख खान याच्या हातामध्ये हात घालून फोटो शेअर करत खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये.

दीपिकाने शाहरूख खान याच्यासोबत मिळून किंग चित्रपटाचे शूटिंग सुरू केले. दीपिकाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, शाहरूख खानसोबत पदार्पणातून त्याने मला एक पहिला धडा शिकवला तो म्हणजे चित्रपट निर्मितीचा अनुभव आणि तुम्ही ज्या लोकांसोबत काम करता ते सर्वात महत्त्वाचे आहे. दीपिकाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, जवळपास 18 वर्षांपूर्वी ‘ओम शांती ओम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरूखने मला पहिला धडा शिकवला तो म्हणजे चित्रपट बनवण्याचा अनुभव आणि तो बनवणारे लोक त्याच्या यशापेक्षा जास्त महत्त्वाचे असतात.

पुढे दीपिकाने म्हटले की, मी याच्याशी पूर्णपणे सहमत आहे आणि तेव्हापासून मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयात ही गोष्ट लागू केलीये. मला वाटते की, यामुळेच कदाचित आपण पुन्हा एकत्र आलो आहोत. ही पोस्ट दीपिका पादुकोण हिने शाहरूख खानला टॅग देखील केलीये. तिने “किंग अँड डे 1.” असे म्हटले. दीपिका पादुकोण आणि शाहरूख खान सहाव्या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. दोघांची जोडी कायमच हीट ठरलीये.

प्रभासच्या कल्की 2898 एडी’  चित्रपटातून अचानक बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याने दीपिका पादुकोण हिला मोठा धक्का बसल्याचे सांगितले जाते. या चित्रपटातून दीपिकाला काढण्यात आल्याची अनेक कारणे ही सध्या सांगितले जात आहेत. दीपिकाने फिस जास्त घेतली होती आणि काम कमी तास करेल अशी तिची अट असल्याची चर्चा आहे.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.