Video |  फिटनेसकडे बारकाईने लक्ष देतेय ‘धोनी’ गर्ल दिशा पाटनी, पाहा तिचा वर्कआऊट व्हिडीओ…

Harshada Bhirvandekar

Harshada Bhirvandekar | Edited By: अनिश बेंद्रे

Updated on: Mar 24, 2021 | 7:59 AM

अलीकडेच दिशाने तिचा आवडता गो-टू व्यायाम व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिचे चाहते देखील अवाक् झाले आहेत. दिशाच्या या फिटनेस व्हिडिओमध्ये तिने पिंक कलरचा स्वेटशर्ट घातला होता तर, त्यासोबत लांब ब्लॅक शॉर्ट्स परिधान केले होते.

Video |  फिटनेसकडे बारकाईने लक्ष देतेय ‘धोनी’ गर्ल दिशा पाटनी, पाहा तिचा वर्कआऊट व्हिडीओ...
दिशा पाटनी

मुंबई : बॉलिवूडची बहुचर्चित अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) सध्या बरीच चर्चेत आहे. माध्यमच नव्हे, तर सोशल मीडिया हँडलवर देखील दिशा प्रचंड सक्रिय आहे. दररोज न चुकता ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काहीना काही व्हिडिओ किंवा फोटो शेअर करत असते (Bollywood Actress Disha Patani share workout video on social media).

बऱ्याच चाहत्यांनी दिशाला जिममध्ये मार्शल आर्ट्स आणि किक बॉक्सिंग करताना नेहमी पाहिलेले आहे. परंतु, तिला कधीही वर्कआऊट करताना पाहिले नव्हते. जर आपण तिला वर्कआऊट करताना पाहिले तर, कदाचित आपलाही श्वास रोखला जाईल. सध्या दिशा व्यायामाबद्दल आणि फिटनेसबद्दल बरीच गंभीर झाली आहे आणि तिच्या रूटीनमध्ये काहीतरी नवीन जोडण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरुन तिचे हे वर्कआऊट सेशन आणखी मनोरंजक होईल.

अलीकडेच दिशाने तिचा आवडता गो-टू व्यायाम व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिचे चाहते देखील अवाक् झाले आहेत. दिशाच्या या फिटनेस व्हिडिओमध्ये तिने पिंक कलरचा स्वेटशर्ट घातला होता तर, त्यासोबत लांब ब्लॅक शॉर्ट्स परिधान केले होते.

पाहा दिशाचा वर्कआऊट व्हिडीओ

दिशाच्या कसरती

व्यायाम करताना तिने आपले केस सैल पोनीटेलमध्ये बांधले आहेत, ज्यामुळे तिचे केस पुन्हा पुन्हा चेहऱ्यावर येत आहेत. या व्हिडीओच्या पहिल्या क्लिपमध्ये दिशा 70 किलो वजन उचलताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना दिसणे असे म्हटले की, ती हा व्यायाम किमान दोनदा करते (Bollywood Actress Disha Patani share workout video on social media).

यानंतर दिशा आपल्या थायीजवर (मांड्याच्या मदतीने) जवळपास 30 किलोग्रॅम वजन उचलत आहे. या व्यायामाचे तीन सेट करतान दिशा दिसते. हा व्यायामही ती 10 वेळा करते. पुढील व्हिडीओमध्ये दिशा elevated stiff legged deadlift  करत आहे. तिने या व्यामाचे तीन सेट 10-10 वेळा रिपीट केले आहेत. दिशाच्या कसरतीचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. हा व्हिडीओ सामायिक करताना दिशाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘माझ्या आवडीच्या काही गो-टू एक्सरसाईज.’

लवकरच चाहत्यांचा भेटीला येणार

दिशाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिचा ‘राधे’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिशा पाटनी पुन्हा सलमान खानबरोबर स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. दिशाने ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या आणखी एका चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटात दिशा जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि आदित्य रॉय कपूरसोबत दिसणार आहे.

(Bollywood Actress Disha Patani share workout video on social media)

हेही वाचा :

Malaika Arora | मलायकाने चोरी केली चक्क रस्त्यावरची फुले, चाहत्यांनी विचारताच म्हणाली…

पहिल्यांदाच दिसले सुशांतच्या वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य! ‘छिछोरे’ला पुरस्कार मिळाल्यावर व्यक्त केला आनंद!

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI