मागच्या दाराने जा… जया बच्चन यांना थेट सल्ला, वाद वाढणार, अभिनेत्री..
बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या कायमच चर्चेत असतात. भर कॅमेऱ्यासमोर जया बच्चन चिडचिड करताना दिसतात. हेच नाही तर पापाराझी त्यांना जया जी म्हणत असतानाही पापाराझींना चार गोष्टी सुनावताना जया बच्चन कायमच दिसतात.

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या कायमच चर्चेत असतात. जया बच्चन आणि पापाराझी यांच्यातील वाद काही नवीन नाही. कायमच त्या पापाराझींबद्दल भाष्य करताना दिसतात. हेच नाही तर ज्यावेळी पापाराझी त्यांचे फोटो काढतात, त्यावेळी त्या चिडलेल्या असतात. यादरम्यानच त्यांनी मोजो स्टोरीवर बरखा दत्त यांच्याशी बोलताना हद्दच केली होती. हे जे लोक बाहेर घाणेरड्या, पॅन्ट घालून आणि हातात मोबाईल घेऊन फिरतात, त्यांना वाटते की फक्त त्यांच्याकडे मोबाईल आहे म्हणून ते तुमचा फोटो काढू शकतात आणि त्यांना जे वाटेल ते बोलू काहीही शकतात… यावेळी जया बच्चन यांनी पापाराझींच्या पॅन्टवर केलेली कमेंट कोणालाच आवडली नाही. जया बच्चन यांच्या या विधानाचा बॉलिवूडमधूनही विरोध करण्यात आला. शत्रुघ्न सिन्हा यांनीही पापाराझींचे समर्थन करत जया बच्चन यांच्या कमेंटवर भाष्य केले. जवळपास सर्वच कलाकारा पापाराझींचा सन्मान करतात, मात्र, जया बच्चन यांच्या विधानाने खळबळ उडाली.
प्रसिद्ध पापाराझी वरिंदर चावला यांनी जया बच्चन यांच्या वक्तव्यावर आता प्रतिक्रिया दिली असून त्यांना आरसा दाखवण्याचे काम केले. यासोबतच त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, मला वैयक्तीकरित्या जया बच्चन यांचे बोलणे अजिबातच आवडले नाही. सिद्धार्थ कन्नन यांच्यासोबत बोलताना वरिंदर चावला यांनी म्हटले की, जया बच्चन यांनी आमच्या कर्मचाऱ्यांबद्दल केलेली टिप्पणी खूप जास्त दु:ख देणारी होती. मुळात म्हणजे आपले मत मांडण्याचे अनेक मार्ग असतात, पण हा मार्ग नक्कीच चुकीचा होता.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आणि रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण या कलाकारांनी सर्व पापाराझींना चहासाठी आमंत्रित केले आणि त्यांनी आम्हाला नम्रपणे सांगितले की, आमच्या मुलांचे फोटो घेऊ नका.. आमच्या पोरांनी देखील कधीच त्याचे उल्लंघन केले नाही. जया बच्चन यांना त्यांचे फोटो घेण्याची काही समस्या असेल तर त्यांनीही स्पष्टपणे बोलायला हवे.
पापाराजी जया बच्चन यांना जया जी म्हणून हाक मारतात, त्यांचा प्रचंड सन्मान करतात. मुळात म्हणजे असं आहे की, तुम्हाला पापाराझींना टाळायचे असेल तर एक सोपा मार्ग आहे की, कार्यक्रमात दोन गेट प्रवेशासाठी असतात. एक म्हणजे रेड कार्पेट आणि दुसरे म्हणजे मागचा रस्ता. जर तुम्हाला पापाराझींना फोटो काढू द्यायचे नसतील तर तुम्ही आरामात मागच्या रस्त्याने कार्यक्रमात सहभाही होऊ शकतात. पण तसे नाही, तुम्हाला जाणुनबुजून गोंधळ घालायचा आहे. याला काही अर्थ नसतो.
