काजोल हिने शेअर केला ‘तो’ खास फोटो, अजय देवगण आणि मुलगी गायब, अखेर…
बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही नेहमीच चर्चेत असते. आपल्या चित्रपटांचे प्रमोशनही काजोल ही सोशल मीडियाच्या माध्यमातून करताना दिसते. काजोल हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे तिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंगही बघायला मिळते.

अभिनेत्री काजोल हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे काजोलची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. काजोल ही आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. काजोल ही सरजमीन या चित्रपटामध्ये धमाका करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे काजोल हिच्यासोबत या चित्रपटामध्ये इब्राहिम अली खान हा स्क्रीन शेअर करताना दिसेल. इब्राहिम अली खान हा बॉलिवूडमध्ये या चित्रपटाच्या माध्यमातूनच पर्दापण करणार आहे. बहिण सारा अली खाननंतर इब्राहिम अली खान हा बॉलिवूडमध्ये पर्दापण करण्यास सज्ज आहे.
आपल्या आगामी चित्रपटामुळे काजोल ही चर्चेत असतानाच तिने एक अत्यंत खास असा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. काजोल ही हा फोटोमध्ये आनंदाने जेवण वाढताना दिसत आहे. काजोल हिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिचे सर्व मित्र आणि मैत्रिण दिसत आहेत. डाईनिंग टेबलवरील फोटो काजोल हिने शेअर केलाय.
यासोबतच सर्वजण हे जेवण करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे काजोल ही सर्वांना प्रेमाने जेवण वाढताना दिसत आहे. टेबलवर अनेक खाद्यपदार्थ दिसत आहेत.सर्व पदार्थ हे इंडियन आहेत. आता काजोल हिने शेअर केलेला हा फोटो चांगलाच व्हायरल होतोय. काजोल हिने आपल्या घरी जवळच्या मित्रांना जेवणास बोलावले होते.
View this post on Instagram
काजोल हिने हा फोटो शेअर करत लिहिले की, ‘लिंडनर’. काजोल हिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये अजय देवगण आणि मुलगी निसा देवगण हे दिसत नाहीयेत. काजोल हिची लेकही कायमच चर्चेत असते. निसा हिचे सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होताना दिसतात. मात्र, लोक निसाच्या व्हिडीओ आणि फोटोवर टीका करताना दिसतात.
काजोल हिच्या करिअरमध्ये सर्वात हीट चित्रपट ‘बेखुदी’ हा ठरलाय. बाजीगर, दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है अशा अनेक चित्रपटांमध्ये काजोल हिने महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. काजोल हिच्या चित्रपटांना चाहते हे कायमच प्रेम देताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच काजोलची वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
