AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका मुलीच्या बापासोबत लग्न केल्याचा अभिनेत्रीला पश्चाताप, घटस्फोटानंतर अखेर थेट म्हणाली, ‘दुःख कमी करण्याऐवजी…’

एका मुलीच्या बापासोबत वयाच्या 28 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं लग्न... 2 वर्षात पश्चाताप... घटस्फोटानंतर थेट म्हणाली, दुःख कमी करण्याऐवजी...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा...

एका मुलीच्या बापासोबत लग्न केल्याचा अभिनेत्रीला पश्चाताप, घटस्फोटानंतर अखेर थेट म्हणाली, 'दुःख कमी करण्याऐवजी...'
Kalki Koechlin
| Updated on: Apr 24, 2026 | 8:44 AM
Share

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना दुसऱ्या बायकोचा लेबल मिळाला. दुसरी पत्नी म्हणून अनेक अभिनेत्रींचा संसार सुखी आणि आनंदी ठरला, पण काही अभिनेत्रींवर मात्र पश्चाताप करण्याची वेळ आली. असंच काही एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रीसोबत देखील झालं आहे. सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री कल्कि कोचलिन आहे. कल्कि हिने अनेक हीट सिनेमांमध्ये काम केलं. बॉलिवूडमध्ये अभिनेत्री यशाच्या शिखरावर चढली, पण खासगी आयुष्यात मात्र अभिनेत्रीने अनेक उतार – चढाव पाहिले…

कल्की हिने वयाच्या 28 व्या वर्षी दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यासोबत लग्न केलं. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर अभिनेत्री वाईट दिवसांचा सामना केला. याबद्दल स्वतः कल्की हिने मोठा खुलासा केला आहे. ‘दुःख कमी करण्यापेक्षा ते अनुभवलेलं कधीही चांगलं असतं…’ असं अभिनेत्री म्हणाली.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘फक्त थेरेपीने काहीही होत नाही जेव्हा तुम्ही आयुष्यातील वाईट काळातून जात असता, तेव्हा कधी – कधी थेरेपी घेणं देखील कठीण होतं. तेव्हा तुम्हाला दुःख अनुभवनं फार महत्त्वाचं असतं. अशा काळात प्रामाणिकपणा फार महत्त्वाचा असतो… मला असं वाटतं की, दुःख कमी करण्यापेक्षा ते अनुभवलेलं कधीही चांगलं असतं…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘अशी नाती मोडल्यानंतर त्या व्यक्तीपासून लांब राहणं गरजेचं आहे. कारण यामुळे राग आणि वेदना हळू हळू कमी होतात. पुढे काय करायचं याबद्दल कळू लागलं आणि मार्ग मोकळा होतो… या काळात आठवणींसोबत आयुष्य जगावं लागतं… घटस्फोटानंतरचा काळ हा फार वाईट काळ असतो… कारण तुम्ही त्या नात्यातून बाहेर येता… जेथे एकत्र राहणं शक्यच नसतं… माझ्यासोबत देखील असं झालं आहे…. आम्ही एकमेकांपासून लांब राहिलो, ज्यामुळे आता चांगल्या प्रकारे आम्ही कधी कधी एकमेकांना भेटतो…’

सांगायचं झालं तर, कल्की आणि अनुराग यांची पहिली भेट ‘देव डी’ सिनेमाच्या सेटवर झालेली. कालांतराने भेटीच प्रेमात रुपांतर झालं आणि 2011 मध्ये दोघांनी लग्न केलं. पण त्यांचं लग्न 2 वर्ष देखील टिकलं नाही. 2015 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला… अनुराग याचं पहिलं लग्न आरती बजाज हिच्यासोबत झालेलं. त्यांना एक मुलगी देखील आहे.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?