‘किती सुंदर’, कतरिना कैफने दाखवली मुलाची पहिली झलक, विकी कौशलच्या ‘या’ चित्रपटावरून ठेवलं मुलाचं नाव
कतरिना कैफ आणि विक्की कौशल हे 7 नोव्हेंबर 2025 रोजी पालक झाले आहेत. अशातच आता दोघांनी त्यांच्या मुलाचे नाव जाहीर केले आहे. काय आहे नाव जाणून घ्या सविस्तर

Katrina Kaif : बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि सर्वांची आवडती जोडी म्हणजे कतरिना कैफ आणि विकी कौशल. दोघांसाठी 7 नोव्हेंबर 2025 हा दिवस आयुष्यातील सर्वात आनंदाचा ठरला. याच दिवशी कतरिना आई झाली आणि त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले. अशातच आता या दोघांनी सोशल मीडियावर आपल्या मुलाचे नाव जाहीर करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.
कतरिना आणि विकी यांनी आपल्या मुलाचे नाव ‘विहान कौशल’ ठेवले असून हे नाव विकी कौशलच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरलेल्या चित्रपटाशी जोडलेले आहे. दोघांनी सोशल मीडियावर एक अतिशय गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कतरिना आणि विकी यांच्या बाळाचा छोटासा हात दिसत असून ही झलक पाहून चाहते देखील खूश झाले आहेत.
हा फोटो शेअर करताना दोघांनी भावनिक कॅप्शन लिहिले, ‘आमचा आशेचा किरण. विहान कौशल. प्रार्थनांची दखल घेतली गेली. जीवन सुंदर आहे. आमचे जग एका क्षणात बदलले’ असं म्हटलं आहे.
चाहत्यांकडून विहानवर प्रेमाचा वर्षाव
मुलाचे नाव जाहीर होताच सोशल मीडियावर चाहत्यांकडून विहानवर शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे. अनेक चाहत्यांनी या नावामागील अर्थ आणि भावना समजून घेत दोघांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.
खूप कमी लोकांना माहीत असेल की, ‘विहान’ हे नाव विकी कौशलच्या सुपरहिट चित्रपट ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’शी जोडलेले आहे. या चित्रपटात विकी कौशलने मेजर विहान सिंग शेरगिल ही भूमिका साकारली होती. हा चित्रपट विकीच्या करिअरसाठी मैलाचा दगड ठरला.
View this post on Instagram
‘उरी’ पूर्वी विकीने ‘मसान’, ‘राजी’, ‘संजू’ सारख्या चित्रपटांमध्ये प्रभावी भूमिका साकारल्या होत्या. मात्र ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’मधील मुख्य भूमिकेमुळे त्याला खरी ओळख आणि सुपरस्टारडम मिळाले. त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षक आणि समीक्षक देखील प्रचंड खूश झाले होते.
याच चित्रपटामुळे विकीच्या करिअरला नवे वळण मिळाले आणि त्यामुळेच हा चित्रपट आणि ‘विहान’ हे नाव त्यांच्या आयुष्यासाठी लकी मानले जात असल्याची चर्चा आहे.
प्रेमकहाणीपासून कुटुंबापर्यंतचा प्रवास
अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर 9 डिसेंबर 2021 रोजी कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी राजस्थानमधील सवाई माधोपुर येथे पंजाबी रीतिरिवाजानुसार विवाह केला. त्यांचे लग्न बॉलीवूडमधील सर्वात चर्चित लग्नांपैकी एक ठरले. लग्नाच्या चार वर्षांनंतर ते पालक झाले. कुटुंब आणि मुलावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कतरिना काही काळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.
