शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचे ‘या’ अटीवर लग्न, अत्यंत मोठा खुलासा
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या फिटनेसमुळे कायमच चर्चेत असते. शिल्पा शेट्टी सोशल मीडियावरही सक्रिय दिसते. आता नुकताच शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याने अत्यंत मोठा खुलासा त्यांच्या लग्नाबद्दल केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा हा कायमच चर्चेत असतो. राज कुंद्रावर काही दिवसांपूर्वीच गंभीर आरोप झाली. हेच नाही तर जेलमध्येही राहण्याची वेळ आली होती. पॉर्न शॉर्ट व्हिडीओमध्ये राज कुंद्राचे पाय खोलात असल्याचे स्पष्ट झाले. हेच नाही तर राज कुंद्रा हा जेलमध्ये असताना शिलपा त्याला घटस्फोट देणार असल्याची तूफान चर्चा होती. आता नुकताच राज कुंद्रा हा भारत सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या शोमध्ये दाखल झाला. यावेळी राज कुंद्राने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. तो पहिल्यांदाच त्याच्या आणि शिल्पाच्या लग्नाबद्दल बोलताना दिसला. शिल्पा त्याची दुसरी पत्नी आहे.
राज कुंद्रासोबत लग्न होण्याच्या अगोदर शिल्पा शेट्टी ही बॉलिवूड स्टार अक्षय कुमारला डेट करत. मात्र, तिने अक्षयवर गंभीर आरोप लावली. अक्षय कशाप्रकारे आपल्याला धोका देत हे तिने सांगितले. राज कुंद्राने सांगितले की, त्याची आणि शिल्पा शेट्टीची पहिली भेट ही दुबईत झाली. शिल्पाचा मॅनेजर हा राज कुंद्राचा चांगला मित्र होता. ज्यावेळी आपण शिल्पा शेट्टीच्या प्रेमात पडलो, त्यावेळी माझे भारतात काही नव्हते, एक साधे घर देखील नव्हते.
जन्मच लंडनमध्ये झाला आणि त्यानंतर दुबईला शिफ्ट झालो. मी माझ्या आणि शिल्पाच्या नावावर अमिताभ बच्चन यांच्या घरासमोर फ्लॅट खरेदी केला आणि शिल्पाला प्रपोज केला. मात्र, तिने मला होकार देण्यासाठी तब्बल दीड वर्ष लावली. शिल्पाची लग्नासाठी एकच अट होती की, काही झाले तरीही ती भारत सोडणार नाही. ती भारताची मुलगी होती आणि तिला भारतातच राहायचे होते. मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि तिची प्रत्येक गोष्ट ऐकतो.
मग मी तिला सांगितले की, लग्नानंतर मीच भारतात राहिल आणि तुला भारत सोडण्यासाठी कधीच दबाव आणणार नाही. फक्त आपण फिरण्यासाठी विदेशात जात जाऊ. त्यानंतर तिने लग्नासाठी होकार दिला. माझे आई वडील देशातच असतात. राहिला प्रश्न माझ्या कामाचा तर मी कुठेही बसून माझे काम सांभाळू शकतो. दिवाळीला वगैरे माझे आई वडील आमच्याकडे येतात.
