VIDEO | सनी लिओनीच्या गाऊनची चेन लावण्यासाठी चौघांचा आटापिटा

‘एमटीव्ही स्प्लिट्सविला’ (MTV Splitsvilla) या शोच्या सेटवर Sunny Leone सोबत हा प्रकार घडला. (Sunny Leone Oops moment )

VIDEO | सनी लिओनीच्या गाऊनची चेन लावण्यासाठी चौघांचा आटापिटा
Sunny Leone Oops moment
अनिश बेंद्रे

|

May 23, 2021 | 2:39 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सनी आपले फोटो-व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते. नुकताच सनीने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचे वॉर्डरोब मालफंक्शन (Wardrobe Malfunction) झाल्याचे दिसत आहे. सनीच्या सुंदरशा गाऊनची चेन नादुरुस्त झाल्यामुळे ती काहीशी नाराज झाली. (Bollywood Actress Sunny Leone shares an Oops moment Wardrobe Malfunction Video on MTV Splitsvilla set)

सनी लिओनीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने पिवळ्या रंगाचा गाऊन घातल्याचे दिसत आहे. या गाऊनमध्ये सनी अत्यंत देखणी दिसत आहे. मात्र या गाऊनमुळेच तिला अडचणींचा सामना करावा लागत आहे. सनीची अडचण सोडवण्यासाठी तिची पूर्ण कॉश्चुम टीम मदतीला धावली आहे.

नेमकं काय घडलं?

‘एमटीव्ही स्प्लिट्सविला’ (MTV Splitsvilla) या शोच्या सेटवर हा प्रकार घडला. सनीने घातलेल्या पिवळ्या रंगाच्या गाऊनची मागची चेन लागत नव्हती. सनीच्या गाऊनची बॅकचेन लावण्यासाठी अनेक जण जोर लावताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. गाऊनची चेन लावताना तिच्या एका टीम मेंबरचं तर बोटही चेमटलेलं दिसतं.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

(Sunny Leone Oops moment )

वॉर्डरोब मालफंक्शन काय आहे?

बॉलिवूड अभिनेत्री-मॉडेल्स यांच्यासोबत वॉर्डरोब मालफंक्शनच्या घटना बर्‍याचदा घडतात. ज्यामुळे अभिनेत्रींना लज्जास्पद घटनेला सामोरं जावं लागतं. वॉर्डरोब मालफंक्शन म्हणजे कॉश्च्युमचा एखादा भाग निसटल्याने ओढवलेली नामुष्की. यामुळे बॉलिवूड अभिनेत्री बर्‍याच वेळा असे प्रसंग टाळण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेतात.

सनी सध्या केरळमध्ये आपल्या आगामी चित्रपटाचं शूटिंग करत आहे. त्यासोबतच काही रिअॅलिटी शोचंही चित्रिकरण ती करत आहे. सनी सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या फोटो आणि व्हिडीओंवर चाहत्यांच्या उड्या पडत असतात.

संबंधित बातम्या :

Sunny Leone | सनी लिओनीच्या कार नंबरचा दुरुपयोग, मुंबईत तरुणाविरोधात गुन्हा

Untold Story of Sunny Leone | सनी लिओनला बनायचं होतं नर्स, कशी बनली पॉर्नस्टार?

(Bollywood Actress Sunny Leone shares an Oops moment Wardrobe Malfunction Video on MTV Splitsvilla set)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें