AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तमन्ना भाटियाची ‘मैसूर सँडल सोप’ सोडा, या साबणाच्या जाहिरातीने मोडल्या होत्या सर्व मर्यादा

अभिनेत्री तमन्ना भाटिया ‘मैसूर सँडल साबण’ या जाहिरातीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. पण यापूर्वी तिची आणखी एक जाहिरात चर्चेत होती. या जाहिरातीने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.

तमन्ना भाटियाची 'मैसूर सँडल सोप' सोडा, या साबणाच्या जाहिरातीने मोडल्या होत्या सर्व मर्यादा
Tammana BhatiaImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 24, 2025 | 10:06 AM
Share

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया ‘मैसूर सँडल साबण’ची ब्रँड अॅम्बेसेडर झाली आणि अनेकांच्या नजरेत खटकू लागली. ‘मैसूर सँडल साबण’ हा कर्नाटकातील प्रसिद्ध साबण ब्रँड आहे, जो तिथल्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक मानला जातो. हा साबण पहिल्यांदा 1916 मध्ये बनवला गेला. त्यामुळे जेव्हा तमन्ना भाटियाला कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेड (KSDL) चा चेहरा बनवण्यात आले, तेव्हा कर्नाटकातील लोक संतापले. सरकारच्या या निर्णयावर टीका करत लोकांनी तमन्नाला देखील ट्रोल केले. पण साबणाच्या ब्रँडबाबत असा वाद प्रथमच घडला असे नाही.

तमन्नाने लिरिल साबणाच्या जाहिरातीनेही आपल्या बोल्ड कंटेंटमुळे खूप प्रसिद्धी मिळवली होती. पण तिला या जाहिरातीमुळे टीकेचाही सामना करावा लागला होता. मात्र, कालांतराने लोकांनी ही जाहिरात केवळ स्वीकारलीच नाही, तर ती खूप आवडलीही. अनेक वर्षांनंतरही ही जाहिरात लोकांच्या स्मरणात आहे. लिरिलने आपले थीम साँग कायम ठेवले, पण प्रत्येक नव्या जाहिरातीत बोल्डनेसचा तडका वाढवत गेले. प्रत्येक जाहिरातीत एक मॉडेल स्विमसूट घालून धबधब्याखाली आंघोळ करताना दिसायची. या साबण ब्रँडच्या एका जाहिरातीच्या टॅगलाइननेही खूप चर्चा मिळवली होती. वाचा: पाकिस्तानमधून पळून आला अन् बनला बॉलिवूडचा सुपरस्टार, आता ऑपरशेन सिंदूरचं केलं कौतुक

सरकारी निर्णयाचा विरोध

‘मैसूर सँडल साबण’च्या बाबतीत कर्नाटकातील लोक सरकारला प्रश्न विचारत आहेत. कर्नाटकात अनेक चांगल्या अभिनेत्री आहेत तरीही बाहेरच्या व्यक्तीला या साबणाचा ब्रँड अॅम्बेसेडर का बनवले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारच्या मंत्र्याने तमन्नाच्या निवडीबाबत खुलासा केला, पण वाद थांबण्याचे नाव घेत नाही. कर्नाटक सरकारने तमन्ना भाटियाला दोन वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर बनवले असून, त्यासाठी तिला 6.2 कोटी रुपयांची फी देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाला सामान्य लोकांसह विरोधी पक्षांनीही विरोध केला आहे. भारतीय जनता पक्षानेही सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. टीकाकार सातत्याने सांगत आहेत की, ‘मैसूर सँडल साबण’ हा कर्नाटकाच्या सांस्कृतिक वारशाशी घट्ट जोडलेला आहे, त्यामुळे सरकारने या ब्रँडसाठी कन्नड अभिनेत्रीची निवड करायला हवी होती.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.