AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : ओळखा पाहू कोण ? खणखणीत अभिनयाने गाजवलं बॉलिवूड, 17 कोटींच्या चित्रपटाने कमावले कोट्यावधी , कोण आहे ती ?

सध्या सोशल मीडियावर राधिका आपटेचा एक जुना डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात ती कथ्थक शिकताना दिसतेय. नेहमी ग्लॅमरस दिसणारी ही आघाडीची अभिनेत्री बालपणी किती साधी होती, हे या व्हिडिओतून स्पष्ट होते. तिचा सहज सुंदर अभिनय आणि नृत्यातील ग्रेस पाहून तुम्हीही थक्क व्हाल. राधिकाचा हा अनोखा व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी एक खास भेट आहे.

Video : ओळखा पाहू कोण ? खणखणीत अभिनयाने गाजवलं बॉलिवूड, 17 कोटींच्या चित्रपटाने कमावले कोट्यावधी , कोण आहे ती  ?
| Updated on: Nov 03, 2025 | 4:10 PM
Share

बॉलिवूडमध्ये अनेक नामवंत कलाकार आहे, काही स्टार्स आहेत, तर काही जणी सौंदर्यवती असूनही त्यांच्या अभिनयाचं नाणंही खणखणीत वाजवतात. या अभिनेत्रींचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एका प्रतिभावान अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहे. पण नेहमीप्रमाणे तिचा याच ग्लॅमरस अंदाज दिसत नाहीये तर काही वेगळंचं दृश्य दिसत आहे. तुम्हाला तरी ओळखता येत्ये का ही आघाडीची अभिनेत्री ?

डान्सचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडिया प्लॅटफॉ्रमवर इन्स्टाग्रामवर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सेलिब्रिटींचे लहानपणीचे, त्यांच्या तरूणपणीचे, ऑडिशनचे व्हिडीओही फिरत असतात. आत्ता एकदम सुंदर, ग्लॅमरस दिसणारे हे चेहरे सुरूवातीच्या काळात तुमच्या-आमच्यासारखेच साधे-सुधे दिसतात, की त्यांच्यातला हा फरक पाहून तोंडी आपोआप शब्द येतात.. काय होतीस तू, काय झालीस तू…! पण चांगल्या अर्थाने हो !

असाच एक व्हिडीओ समोर आला आहे तो एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा. कथ्थक क्लासमध्ये इतर विद्यार्थिनींसोबत नृत्य करणारी ही अभिनेत्री आजच्या काळातील आघाडीचं नावं असून तिने फक्त हिंदी चित्रपटच नव्हे तर वेब सीरिज, अनेक हटके चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तिच्या करिअरमध्ये तिने प्रत्येक भूमिकेला न्याय दिला.

कोण आहे ही अभिनेत्री ?

लाल रंगाचा कुर्ता, पांढरी सलवार, पांढरी ओढणी, साधीशी वेणी पण अत्यंत बोलके डोळे, आणि नृत्य करतानाची ग्रेस यामुळे या तरूणीवर डोळे अगदी खिळून राहतात. हा व्हिडीओ जुना असला तरी त्या अभिनेत्रीचे हावभाव, तिची सहजता, लय , यामुळे तिचं हे नृत्यही अगदी भान हरपून बघावं असं. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून,तिचं नाव आहे राधिका आपटे.

पहा व्हिडीओ

@ kathakalaya या पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून त्याला हजारो लाईक्स आले आहेत. त्यावर अनेक लोकांनी कमेंट्स केल्या असून राधिकाच्या नृत्याचं कौतुक केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Mousumi Saha (@kathakalaya)

राधिकाचं करिअर

राधिकाने अनेक वेगळ्या, हटके चित्रपटात काम केलं. ‘बदलापूर’मध्ये ती वरूण धवनसोबत होती तर ‘अंधाधुन’मध्ये ती आयुष्मान खुरानासोबत झळकली, एवंढ नव्हे तर  ‘पॅडमॅन’ मध्ये ती खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारची पत्नी बनली होती. बराच गाजलेल्या ‘मांझी’ चित्रपटातही तिने नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी बनून स्क्रीन शेअर केली होती.

अवघ्या 17 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘अंधाधुन’मध्ये आयुष्मान खुराना, राधिका आपटे आणि तब्बू यांची प्रमुख भूमिका होती. हा चित्रपट 5 ऑक्टोबर 2018 रोजी प्रदर्शित झाला. ‘अंधाधुन’मध्ये आयुष्मानने एका अंध पियानो वादकाची भूमिका केली होती. श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट फक्त 17 कोटीच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता, परंतु भारतात या चित्रपटाने 74 कोटींची कमाई केली.मात्र जगभरात त्याचे कलेक्शन 440 कोटी होते.

राधिका आपटेचं आयुष्य

राधिका आपटेने 2012 मध्ये बेनेडिक्टशी लग्न केलं होतं. केवळ व्हिसा मिळवण्यासाठी हे लग्न केल्याचं तिने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. गेल्या वर्षी तिने मुलाला जन्म दिला. लग्नाच्या 14 वर्षांनंतर राधिका हिने आई होण्याचा निर्णय घेतला. तिला तिच्या खासगी आयुष्याबद्दल जास्त बोलायला आवडत नाही.

महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.