अमिताभ बच्चन यांनी जोडले अखेर हात, भावूक होत म्हणाले, तुम्ही…
अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अमिताभ बच्चन हे काैन बनेंगा करोडपतीचे नवीन सीजन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. सोशल मीडिावरही ते सध्या सक्रिय दिसत आहेत.
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये बॉलिवूडला अनेक हीट चित्रपट दिली आहेत. अमिताभ बच्चन हे काही दिवसांपूर्वीच दीपिका पादुकोण आणि प्रभास यांच्यासोबत धमाल करताना दिसले. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन हे कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही अमिताभ बच्चन हे दिसतात.
अमिताभ बच्चन हे आता चाहत्यांसाठी काैन बनेंगा करोडपतीचे 16 वे सीजन घेऊन आले आहेत. विशेष म्हणजे कालच पहिला एपिसोड झालाय. नेहमीच काैन बनेंगा करोडपतीबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळते. अमिताभ बच्चन हे गेल्या कित्येक वर्षांपासून या सीजनला होस्ट करताना दिसत आहेत. आता अमिताभ बच्चन हे भावूक झाल्याचे बघायला मिळाले.
हेच नाही तर हात जोडून आपल्या प्रेक्षकांचे धन्यवाद मानताना अमिताभ बच्चन हे दिसत आहेत. केबीसीला सपोर्ट केल्याबद्दल आपल्या चाहत्यांचे आभार अमिताभ बच्चन यांनी मानले आहेत. अमिताभ बच्चन म्हणाले की, मी नव्या सीजनला सुरूवात करत आहे पण माझे शब्द कमी पडत आहेत. कारण असा कोणता शब्दच नाही की, त्यामधून मी तुमचे शोला प्रेम दिल्याबद्दल आभार मानू शकतो.
कोणत्या शब्दात मी धन्यवाद मानू…कारण तुम्ही लोकांनी काैन बनेंगा करोडपतीला पुर्नजन्म दिलाय, असेही अमिताभ बच्चन यांनी म्हटले. यासर्व गोष्टींसाठी मी देशाच्या जनतेसमोर नतमस्तक होत असल्याचेही अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे. यावेळी बिग बी यांनी हात जोडत आणि नतमस्तक होत देशाच्या जनतेचा धन्यवाद मानले आहेत.
पुढे अमिताभ बच्चन म्हणाले की, हा मंच तुमचा आहे…हा खेळ तुमचा आहे…हा वेळही तुमचा आहे….अमिताभ बच्चन यांचे बोलणे ऐकून उपस्थित लोकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू निघताना देखील दिसले. आता अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. अमिताभ बच्चन यांच्या या व्हिडीओला चाहते हे मोठ्या प्रमाणात प्रेम देताना दिसत आहेत.