या बॉलिवूड अभिनेत्रीला सगळे म्हणायचे ‘लेडी अमिताभ बच्चन’; बिग बी मात्र झाले नाराज, म्हणाले ‘हे फार चुकीचं…’
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला 'लेडी अमिताभ बच्चन' म्हटले जायचे. अभिनेत्रीचा अभिनय आणि प्रसिद्धी पाहता हा टॅग देण्यात आला. मात्र यावर खुद्द अमिताभ बच्चन यांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली होती. पण त्यामागे बिग बींनी कारणही सांगितलं होतं. ते काय होतं जाणून घेऊयात.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचे कौतुक अगदी अभिनेत्यांच्या तोडीस तोड केलं जातं. अशीच एक अभिनेत्री जिला अभिनय आणि कामात असलेलं परफेक्शन पाहून सगळे ‘लेडी अमिताभ’ म्हणायचे. संपूर्ण बॉलिवूडमध्ये अभिनेत्री याच नावाने ओळखली जायची. एवढंच नाही तर ही अभिनेत्री एवढी प्रसिद्ध होती की तिने तिच्या कौशल्याने प्रमुख अभिनेत्यांनाही मागे टाकलं होतं. तसेच बॉलिवूडची ही पहिली महिला सुपरस्टार होती कि तिला प्रसिद्ध अभिनेत्यांपेक्षाही जास्त मानधन मिळालं.
“लेडी अमिताभ बच्चन” असं नाव मिळालं
चित्रपटसृष्टीतील तिच्या यशामुळे तिला हिंदी चित्रपटसृष्टीत “लेडी अमिताभ बच्चन” असं नाव मिळालं.प्रत्येक अभिनेत्यापासून ते निर्माते, दिग्दर्शकापर्यंत सगळेच तिच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असायचे. अशी टॅलेंटेड अभिनेत्री म्हणजे अर्थातच श्रीदेवी. त्यांचा अभिनय, सौंदर्य ते त्यांचे कामाप्रती असलेले प्रेम यामुळे त्यांनी सर्वांच्या मनावर राज्य केलं.आज श्रीदेवी आपल्यात नसल्या तरी देखील त्यांची क्रेझ मात्र कमी झालेली नाही.
अमिताभ बच्चन यांनी आक्षेप घेतला होता
श्रीदेवींना “लेडी अमिताभ बच्चन” हा टॅग आवडला होता मात्र अमिताभ बच्चन यांना नाही. एकदा माध्यमांशी संवाद साधत असताना बिग बींना हे विचारण्यात आले होते त्यांना की श्रीदेवींना देण्यात आलेला हा टॅग कसा वाटतो तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “मला हे ऐकून सन्मानित वाटते, पण मला ते खूप चुकीचे वाटते.” याबद्दल अमिताभ बच्चन पुढे म्हणाले, “हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्व कलाकार स्वतंत्र आहेत. प्रत्येकाची स्वतःची ओळख आणि दर्जा आहे. श्रीदेवी हे स्वतःमध्येच एक मोठं नाव आहे. मला अशा प्रकारची तुलना करणे आवडत नाही.”
View this post on Instagram
अशी तुलना करणे चुकीचे आहे.
आपल्या भावना व्यक्त करताना अमिताभ बच्चन म्हणाले होते, “मी याबद्दल काय बोलू? मला वाटते की मीडिया नेहमीच असे करत राहते. तिच्याशी तुलना करणे मला सन्मानित वाटते, परंतु मी पुन्हा एकदा सांगेन की हे खूप चुकीचे आहे. जेव्हा श्रीदेवी एक यशस्वी अभिनेत्री आहे त्यासाठी तिला लेडी अमिताभ बच्चन म्हटले जाणे खरंच योग्य आहे का? कारण त्यांची मेहनत आणि काम फार मोठं आहे.” असं म्हणत अमिताभ यांनी श्रीदेवींचे कौतुक केले होते तसेच त्यांना असा टॅग न देण्याची विनंती केली होती.
अमिताभ बच्चन यांना देखील श्रीदेवी एक अभिनेत्री म्हणून फार आवडायच्या
अमिताभ बच्चन यांना देखील श्रीदेवी एक अभिनेत्री म्हणून फार आवडायच्या. ते देखील त्यांच्यासोबत काम करण्यास इच्छूक असायचे. मुकुल आनंद यांनी त्यांना ‘खुदा गवाह’ चित्रपटाची ऑफर दिली तेव्हा बिग बींनी श्रीदेवीला मुख्य भूमिकेत घेण्याची इच्छा व्यक्त केली.श्रीदेवी हा चित्रपट करण्यास अजिबात तयार नव्हत्या पण अखेर अमिताभ बच्चन यांनी श्रीदेवीला चित्रपटात काम करण्यासाठी मनवलं. त्यासाठी त्यांनी चक्क फुलांनी भरलेला ट्रक श्रीदेवींच्या घरी पाठवला होता.
श्रीदेवी यांनी या अटीवर चित्रपट केला
श्रीदेवी यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘खुदा गवाह’ चित्रपटात काम करण्यास सहमती दर्शवली, परंतु त्यांनी एक अट घातली. त्यांनी सांगितले की जर त्यांना दुहेरी भूमिका ऑफर केली गेली तरच त्या या चित्रपटात काम करतील. श्रीदेवी यांची ही अट मान्य करण्यात आली आणि त्यांना दुहेरी भूमिका मिळाली. हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट झाला आणि त्यातील गाणी आजही मोठ्या प्रमाणात पसंत केली जातात.
