श्रीदेवीच्या प्रेमात ‘हा’ दिग्दर्शक ठार वेडा झालेला, त्यांची देवी सारखी करायचा पूजा, रुममध्येही सर्व श्रीदेवींचेच फोटो
अभिनेत्री श्रीदेवी या केवळ अभिनयासाठीच नव्हे, तर त्यांच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध होत्या. अनेक दिग्दर्शक, अभिनेते त्यांच्या प्रेमात होते, पण एक दिग्दर्शक श्रीदेवींचे प्रचंड मोठे चाहते होते. त्यांच्या प्रेमात वेडे होते. त्यांना श्रीदेवींबद्दल इतकं प्रेम आणि आदर होता ती ते श्रीदेवींना देवीसारखं पूजायचे.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांची तुलना कधीच कोणाशी होऊ शकत नाही. तसेच त्यांचे नाव, त्यांचा अभिनय हा चित्रपटसृष्टीत नेहमीच सहाबहार राहतो. त्यातील एक होत्या अभिनेत्री श्रीदेवी. बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंत श्रीदेवी यांनी राज्य केलं. आपल्या अभिनयांने सर्वांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांना प्रत्येक दिग्दर्शक आपल्या चित्रपटात घेण्यासाठी उत्सुक असायचा. पुरुष कलाकारांपेक्षा जास्त मानधन घेणारी ती पहिली अभिनेत्री होती. तिचा स्टारडम इतका होता की मोठे दिग्दर्शक तिला कास्ट करण्यासाठी खूप जास्त पैसे देत असत.
श्रीदेवी यांनी हिंदी चित्रपटांइतकेच दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही काम केलं
श्रीदेवी यांनी हिंदी चित्रपटांइतकेच दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांनी साउथ चित्रपटांमध्येही स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. तसेच त्यांनी सुपरस्टार्ससोबत काम केले आणि अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. श्रीदेवी त्यांच्या अभिनयामुळे तर सगळ्यांच्या पसंतीस उतरत होत्या. पण सोबतच त्यांच्या सौंदर्यामुळे तर प्रत्येकजण त्यांच्या प्रेमात असायचा. एवढंच नाही तर बॉलिवूडमध्येही कलाकारांपासून ते अनेक दिग्दर्शक, अभिनेत्यांपर्यंत सगळेच त्यांच्यावर प्रेम करत होते.
अभिनेत्रीची देवीसारखी पूजा करायचे
हिंदी व्यतिरिक्त, श्रीदेवीने तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणात काम केले. दरम्यान श्रीदेवींच्या या चाहत्यांमध्ये एक दिग्दर्शक असेही होते की श्रीदेवींच्या एवढे प्रेमात होते की ते अभिनेत्रीची देवीसारखी पूजा करायचे. ते दिग्दर्शक म्हणजे चित्रपट निर्माते आणि सिनेमॅटोग्राफर रवी के. चंद्रन. रवी हे श्रीदेवींचे इतके मोठे फॅन होते की त्यांनी श्रीदेवींच्याप्रती प्रेमासोबतच इतका आदर ठेवला की ते देवी मानायचे. रवी के. चंद्रन यांनी ब्लॅक, पहेली, फना, दिल चाहता है आणि विरासत यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते इंडस्ट्रीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व आहेत.
श्रीदेवींच्या प्रेमात वेडे होते दिग्दर्शक
श्रीदेवींचे सौंदर्य पाहून ते वेडे व्हायचेय. एका मुलाखतीत त्यांनी स्वत: याचा उल्लेख केला आहे. त्यांनी सांगितले की, हॉस्टेलमध्ये असताना ते श्रीदेवीशी संबंधित मासिके आणि पोस्टर्स चोरायचे. त्यांनी हॉस्टेलमधील एक खास खोली श्रीदेवीच्या फोटोंनी भरून टाकली होती. रवी के. चंद्रन यांनी असेही सांगितले की त्यांच्या कॉलेजच्या काळात त्यांनी त्यांच्या खोलीचे रूपांतर श्रीदेवी यांना समर्पित एका खास खोलीत केले होते. परीक्षेपूर्वी विद्यार्थीही त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी तिथे येत असत. ते आणि इतर जण श्रीदेवींना प्रार्थना देखील करत असत. तसेच वर्तमानपत्रे आणि मासिकांमधून देखील ते श्रीदेवींचे फोटो कापून रुममध्ये लावायचे.
View this post on Instagram
अनिल कपूर यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली
पुढे त्यांना एकदा रवी के. चंद्रन यांना श्रीदेवीला भेटण्याची संधी मिळाली. अनिल कपूर यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली होती, हा क्षण ते कधीही विसरले नाही. श्रीदेवींसोबतच्या पहिल्या भेटीची आठवण करून देताना रवी के चंद्रन म्हणाले, “मी राजकुमार संतोषी यांच्याकडे कथा ऐकण्यासाठी गेलो होतो. त्यानंतर त्यांनी मला द हँगओव्हरचा रात्रीचा शो पाहण्यास सांगितले. मी लगेच होकार दिला.”
अभिनेत्रीसोबत काम करण्याची संधी कधीच मिळाली नाही.
पुढे ते म्हणाले “मी मग अनिल कपूरला फोन केला. त्यानंतर त्यांना श्रीदेवीबद्दलच्या माझ्या वेडाबद्दल कळले. त्यांनी लगेच माझी त्यांची भेट घडवून आणली. अनिल कपूर यांनी श्रीला फोन केला आणि थोड्या वेळाने ती अभिनेत्री आमच्यासोबत गाडीत येऊन बसली. तिला पाहूनच माझे हृदय धडधडत होते. मी स्तब्ध झालो.”दुर्दैवाने, रवी के. चंद्रन यांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीसोबत काम करण्याची संधी कधीच मिळाली नाही. 24 फेब्रुवारी 2018 रोजी वयाच्या 54 व्या वर्षी दुबईमध्ये श्रीदेवींचे निधन झाले.
