AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑस्ट्रेलियातून भारतात आला अन् बनला सुपरस्टारचा बॉडीगार्ड, मालकाने संधी दिली अन् केलं 200 चित्रपटांमध्ये काम

ऑस्ट्रेलियामधून आला अन् बनला सर्वात मोठ्या सुपरस्टारचा बॉडीगार्ड, मालकाने दिली संधी तर केलं 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम.

ऑस्ट्रेलियातून भारतात आला अन् बनला सुपरस्टारचा बॉडीगार्ड, मालकाने संधी दिली अन् केलं 200 चित्रपटांमध्ये काम
Image Credit source: Social media
| Updated on: May 26, 2026 | 1:29 PM
Share

ऑस्ट्रेलियातून भारतात आलेला एक सिव्हिल इंजिनिअर पुढे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय ‘विदेशी व्हिलन’ ठरेल याची कल्पना कदाचित त्यालाही नव्हती. हा अभिनेता म्हणजे दिवंगत अभिनेते बॉब क्रिस्टो उर्फ रॉबर्ट जॉन क्रिस्टो.

1980 ते 1990 च्या दशकात हिंदी चित्रपटांमध्ये धिप्पाड शरीरयष्टी, टक्कल लुक आणि दमदार आवाजामुळे बॉब क्रिस्टो यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. विशेष म्हणजे, त्यांचा अभिनय क्षेत्रात येण्याचा कोणताही विचार नव्हता. ते फक्त अभिनेत्रीपरवीन बाबी यांना भेटण्यासाठी मुंबईत आले होते.

ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या बॉब क्रिस्टो यांनी हॉलिवूडच्या गाजलेल्या ‘अपोकॅलिप्स नाऊ’ या चित्रपटाच्या सेट उभारणीच्या कामातही मदत केली होती. त्या काळात त्यांचे आयुष्य पूर्णपणे अभियांत्रिकी क्षेत्राशी जोडलेले होते. मात्र एका मॅगझिनच्या कव्हरने त्यांचे आयुष्यच बदलून टाकले.

परवीन बाबींना भेटण्यासाठी आला अन्…

एका दिवशी बॉब यांनी ‘टाइम’ मॅगझिनच्या कव्हरवर अभिनेत्री परवीन बाबी यांचा फोटो पाहिला. त्या फोटोतील परवीन यांच्या सौंदर्याने ते इतके प्रभावित झाले की त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा निर्माण झाली. याच इच्छेपोटी ते भारतात आले. विशेष म्हणजे, ते मूळतः ऑस्ट्रेलियातून मस्कटकडे निघाले होते. मात्र व्हिसा न मिळाल्याने त्यांना भारतात थांबावे लागले आणि त्यातूनच त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले.

मुंबईत आल्यानंतर चर्चगेट परिसरात त्यांची एका चित्रपट युनिटशी भेट झाली. त्यावेळी त्यांना समजले की दुसऱ्या दिवशी ‘द बर्निंग ट्रेन’ चित्रपटाच्या सेटवर परवीन बाबी येणार आहेत. ही माहिती मिळताच बॉब दुसऱ्या दिवशी सेटवर पोहोचले. त्यांनी एका कॅमेरामनशी परवीन बाबींबद्दल चर्चा सुरू केली होती. इतक्यात मागून एका मुलीचा आवाज आला. बॉब वळून पाहतात तर समोर स्वतः परवीन बाबी उभ्या होत्या.

200 हून अधिक चित्रपटांमध्ये केलं काम

मुंबईत राहत असताना जुहू बीचवर फिरताना त्यांची भेट अभिनेता-दिग्दर्शक संजय खान यांच्याशी झाली. संजय खान यांनी बॉब यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन त्यांना भारतातच राहण्याचा सल्ला दिला. इतकेच नाही तर त्यांनी बॉब यांना स्वतःच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी कामावरही ठेवले.

Latest and Breaking News on NDTV

यानंतर बॉब क्रिस्टो यांची हिंदी चित्रपटसृष्टीत एंट्री झाली आणि त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी 200 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. बहुतेक चित्रपटांमध्ये ते विदेशी गुंड, सैन्य अधिकारी, तस्कर किंवा आंतरराष्ट्रीय व्हिलनच्या भूमिकांमध्ये दिसले. त्यांच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वामुळे ते त्या काळातील सर्वात ओळखण्याजोग्या कलाकारांपैकी एक बनले होते. परवीन बाबींच्या एका फोटोमुळे सुरू झालेला हा प्रवास पुढे बॉलिवूडच्या इतिहासातील एक रंजक अध्याय ठरला.

Follow Us
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या...
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या, व्हिडिओवर नेटकरी फिदा
खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर एकाचा जागीच मृत्यू
Roha Accident | खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर पोलीस पाटलाचा जागीच मृत्यू
महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर?
Maharashtra ATS Raid | महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर? थेट पाकिस्तानशी...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण?; सुप्रिया सुळेंनी उघड केली इनसाईड स्टोरी...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण?; सुप्रिया सुळेंनी उघड केली इनसाईड स्टोरी, म्हणाल्या...
हो... कदरूपणा आहे! राऊतांचं शिंदेंना चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
हो... कदरूपणा आहे! राऊतांचं शिंदेंना चोख प्रत्युत्तर; म्हणाले, बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दरोडा...
रमेश म्हात्रेंच्या भवितव्याचा आज फैसला होणार?; दोन दिवस रुग्णालयात...
Ramesh Mhatre Case | दोन दिवस रुग्णालयात उपचार...आता थेट कोर्टात!; रमेश म्हात्रेंच्या भवितव्याचा आज फैसला होणार?