नवीन ‘तारक मेहता’चा पगार खूपच कमी, शैलेश लोढा यांची फीस तब्बल इतकी पट जास्त आणि…
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत तारक मेहताचे पात्र अनेक वर्षे शैलेश लोढा यांनी साकारले होते. मात्र, 2022 मध्ये शैलेश लोढा यांनी मालिकेला कायमचा रामराम केला. जाताना मालिकेचे निर्माते अर्थात असित कुमार मोदी यांच्यावरही गंभीर आरोप केले. अनेक जाहिर कार्यक्रमांमध्येही शैलेश लोढा हे असित कुमार मोदीबद्दल बोलताना दिसले.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही मालिका घरातील प्रत्येक सदस्याची आवडती आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अनेक कलाकारांनी मालिकेला सोडचिठ्ठी दिलीये. हेच नाही तर काही कलाकारांनी थेट मालिकेच्या निर्मात्यांवरच गंभीर आरोप केले आहेत. अनेक कलाकार मालिका सोडून जात आहेत आणि नवीन कलाकार हे मालिकेत येत आहेत. तरीही प्रेक्षकांनी मालिकेवरील प्रेम कमी केले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. दयाबेन देखील काही वर्षांपासून मालिकेपासून दूर आहे.
शैलेश लोढा यांनी थेट म्हटले होते की, मला माझ्या कामाचे आणि हक्काचे पैसे असित कुमार मोदी यांच्याकडून देण्यात नाही आले. विशेष म्हणजे शैलेश लोढा हे तारक मेहता मालिकेला सुरूवातपासून जोडले गेले होते. एका एपिसोडसाठी तगडी फीस देखील शैलेश लोढा घेत असत. मागेल तेवढी फीस देखील निर्मात्यांकडून शैलेश लोढा यांना दिली गेली.
नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार शैलेश लोढा हे एका एपिसोडसाठी 1.5 लाख फीस घेत होते. शैलेश लोढा यांच्यानंतर तारक मेहता मालिकेमध्ये सचिन श्रॉफ हे ही भूमिका साकारत आहे. मात्र, शैलेश लोढा आणि सचिनच्या फीसमध्ये मोठी तफावत असल्याचे बघायला मिळतंय. एका एपिसोडसाठी सचिनला 30 हजार रूपये मिळतात.
सचिन श्रॉफ हे सध्या तारक मेहताचे पात्र चांगल्या पद्धतीने साकारताना दिसत आहेत. मात्र, शैलेश लोढा यांनी तारक मेहता मालिका सोडल्यानंतर चाहते निराश झाल्याचे बघायला मिळतंय. शैलेश लोढा हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय दिसत आहेत. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर शैलेश लोढा दिसतात. हेच नाही तर त्यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.