Pankaj Tripathi : मीही माणूसच वाईट तर वाटणारच, पंकज त्रिपाठींनी ऐकवली संघर्षाची कथा

अभिनेता पंकज त्रिपाठी (Actor Pankaj Tripathi) यांनी प्रेक्षकांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलंय. आज ते जिथं आहेत, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. लवकरच स्पोर्ट्स ड्रामा 83मध्ये पीआर मान सिंगच्या भूमिकेत ते दिसणार आहेत. याशिवाय अक्षय कुमार(Akshay Kumar)च्या 'बच्चन पांडे' (Bachchan Pandey) आणि आमिर खान(Amir Khan)च्या 'लाल सिंह चड्ढा'(Lal Singh Chaddha)मध्येही झळकणार आहेत.

Pankaj Tripathi : मीही माणूसच वाईट तर वाटणारच, पंकज त्रिपाठींनी ऐकवली संघर्षाची कथा
पंकज त्रिपाठी
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 3:23 PM

मुंबई : नेहमीच आपल्या अभिनयाच्या जोरावर अभिनेता पंकज त्रिपाठी (Actor Pankaj Tripathi) यांनी प्रेक्षकांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलंय. व्यक्तिरेखा कोणतीही असो, तो नेहमीच आपल्या अभिनयाने त्यात जीव ओततो. ते ज्या चित्रपटात असतात, तो हिट होतो. मात्र आज ते जिथं आहेत, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला.

‘त्यांना हे आठवतही नाही’ आपल्या संघर्षाची कहाणी सांगताना ते म्हणतात, की खरं तर काही लोकांनी माझा अपमान केला. पण त्यांना ते आठवत नाही. ते जेव्हा मला भेटतात, तेव्हा त्यांना हे आठवतही नाही की आपण याला बोललो. लोकांचं असं वागणं पाहून तुम्हाला वाईट वाटतं का, यावर ते म्हणाले, की हो वाईट तर वाटतंच.

‘शेवटी मीही माणूसच’ पुढे ते म्हणतात, की मी शेवटी माणूसच आहे. मला वाईट का वाटत नाही? मला पण राग यायचा, पण या सगळ्या गोष्टी विसरायचा प्रयत्न करतो. कारण वाईट मनात ठेवल्यानं माझंच नुकसान आहे. म्हणूनच मी पुढं गेलो. यावरून हेच स्पष्ट होतं, की त्यांचा अभिनय प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता.

छोट्या शहरातून मुंबईचा प्रवास पंकज त्रिपाठी हे मूळचे बिहारचे आहेत, मनोरंजन विश्वात ठसा उमटवण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे संघर्ष केला. त्यानंतर त्यांना अनुराग कश्यप यांच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटात आपलं अभिनय कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली आणि त्यांनी पडद्यावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ‘मिर्झापूर’मधल्या ‘कालिन भैय्या’च्या भूमिकेत पंकज त्रिपाठींना खूप प्रेम मिळालं.

आगामी चित्रपट पंकज त्रिपाठी यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर ते लवकरच स्पोर्ट्स ड्रामा 83मध्ये पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अक्षय कुमार(Akshay Kumar)च्या ‘बच्चन पांडे’ (Bachchan Pandey) आणि आमिर खान(Amir Khan)च्या ‘लाल सिंह चड्ढा'(Lal Singh Chaddha)मध्येही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

Happy Birthday Rajinikanth Net Worth | ‘थलाइवा’ नादच नको! , सुपरस्टार रजनीकांत यांची संपत्ती पाहून चकीत व्हाल

Himanshu Malhotra : पत्नी अमृता खानविलकरसोबत कधी काम करणार? हिमांशू मल्होत्राचं भन्नाट उत्तर

Ankita-Vicky Mehandi Photos : विकीच्या नावाची मेंदी अंकिताच्या हाती; ‘या’ दिवशी घेणार सात फेरे

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.