AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गर्भवती महिलांसाठी दिया मिर्झाच्या खास टिप्स, कोरोना लस घेण्यासंबंधित माहिती देताना म्हणाली…

एका वापरकर्त्याने गर्भवती महिलांसाठी कोव्हिड प्रोटोकॉलविषयी माहिती दिली. त्याने ट्विट केले की, कोरोनामुळे होणारे नवीन संक्रमण टाळण्यासाठी गर्भवती महिलांनीही लसीकरण करून घ्यावे. युजरच्या या ट्विटवर दिया मिर्झाने उत्तर देऊन योग्य ती माहिती दिली.

गर्भवती महिलांसाठी दिया मिर्झाच्या खास टिप्स, कोरोना लस घेण्यासंबंधित माहिती देताना म्हणाली...
दिया मिर्झा
| Updated on: May 17, 2021 | 11:59 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) लवकरच आई होणार आहे. तिने काही काळापूर्वी व्यावसायिक वैभव रेखीशी लग्न केले आहे. दिया मिर्झा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे आणि आपल्या चाहत्यांना बर्‍याच विषयांवर माहिती देत ​​असते. दियाने नुकतेच ट्विट केले आहे की, सध्या कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी वापरली जाणाऱ्या लसीची अद्याप गर्भवती महिलांसाठी क्लिनिकल चाचणी घेतली गेली नाहीय (Actress Dia Mirza share corona Vaccination information for pregnant womens).

एका वापरकर्त्याने गर्भवती महिलांसाठी कोव्हिड प्रोटोकॉलविषयी माहिती दिली. त्याने ट्विट केले की, कोरोनामुळे होणारे नवीन संक्रमण टाळण्यासाठी गर्भवती महिलांनीही लसीकरण करून घ्यावे. युजरच्या या ट्विटवर दिया मिर्झाने उत्तर देऊन योग्य ती माहिती दिली.

वाचा दियाचे ट्विट

दियाने ट्विट केले की, ‘हे खूप महत्वाचे आहे. वाचा आणि लक्षात ठेवा की, सध्या भारतात वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही लसींची तपासणी गर्भवती महिला किंवा स्तनपान करणार्‍या मातांसाठी केली गेली नाही. डॉक्टर म्हणतात की, या लसीची क्लिनिकल चाचणी होईपर्यंत गर्भवती महिला ही लस घेऊ शकत नाही (Actress Dia Mirza share corona Vaccination information for pregnant womens).

दियाची ‘गुडन्यूज’

दियाने सोशल मीडियावर बेबी बंपसह एक फोटो शेअर करुन आपल्या प्रेग्नन्सीबद्दल माहिती दिली होती. त्या काळात ती हनिमूनसाठी मालदीवमध्ये गेली होती. जिथून तिने सुंदर फोटो शेअर केले आणि तिच्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली. वैभवशी लग्न करण्यापूर्वीच दिया गर्भवती राहिल्याने बर्‍याच लोकांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. यावर तिने ट्रोलर्सना योग्य उत्तर देताना सांगितले की, मी गर्भधारणेमुळे वैभवशी लग्न केले नाही. या सुंदर प्रवासात मला कोणतीही लाज वाटत नाही.

चित्रपटसृष्टीत Sexism

दिया मिर्झाने अलीकडेच तिच्या ‘रेहाना है तेरे दिल’ या चित्रपटातही सेक्सिझम असल्याचे सांगितले होते. दियाने सांगितले की, सेटवरील मेकअप आर्टिस्ट एक बाई नसून एक पुरुष होता, तर केवळ केशभूषा करण्यासाठी स्त्री होती. जेव्हापासून मी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली, त्यावेळी चित्रपटाच्या 120 पेक्षा जास्त क्रूमध्ये केवळ 4 ते 5 महिला होत्या. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, आपण पुरुषप्रधान समाजात राहतो. फिल्म इंडस्ट्री म्हणजे माणसाचा स्केल. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार इंडस्ट्रीमध्ये लैंगिक भेदभाव आहे. तिला कधीकधी वाटते की, ‘असे बरेच पुरुष आहेत जे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आहेत, ज्यांना त्यांच्या लैंगिक विचारसरणीबद्दल माहिती देखील नसते.’

(Actress Dia Mirza share corona Vaccination information for pregnant womens)

हेही वाचा :

Miss Universe 2020 : तोतरेपणा, शरीरावर डाग, तरीही अ‍ॅडलिन कॅस्टेलिनो अशी पोहोचली ‘मिस युनिव्हर्स’पर्यंत

Video: बिकीनीत सायकलिंग, कृष्णा श्रॉफच्या बोल्ड अंदाजामुळे चाहते क्लिन ‘बोल्ड’

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.