AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : दिया मिर्झा प्रेग्नंट, लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच बेबी बम्पसह फोटो शेअर

अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) वयाच्या 39 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढली. 15 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर दियाने वैभव रेखीसोबत (Vaibhav Rekhi) लगीनगाठ बांधली. (Dia Mirza is pregnant, shared picture with baby bump)

| Updated on: Apr 02, 2021 | 1:08 PM
Share
अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) वयाच्या 39 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढली. 15 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर दियाने वैभव रेखीसोबत (Vaibhav Rekhi) लगीनगाठ बांधली.

1 / 6
लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच दियाने बेबी बम्पसह फोटो शेअर करत थेट मालदीव्सहून गुड न्यूज दिली. त्यामुळे चहाटळ चाहत्यांनी दियाला ट्रोल करायलाही सुरुवात केली.

2 / 6
15 फेब्रुवारीला उद्योगपती वैभव रेखी याच्यासोबत दिया मिर्झाचा विवाह झाला. दोघांचंही हे दुसरं लग्न होतं. वैभव हा दियापेक्षा चार वर्षांनी लहान आहे. सध्या ते वाद्र्यातील पाली हिल भागात राहतात. वैभव हा इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. दियाने आपल्या नात्याविषयी जाहीर कबुली लग्न होईपर्यंत दिली नव्हती. मात्र ते 2020 मध्ये भेटल्याचं बोललं जातं. लॉकडाऊनच्या काळात ते एकत्रच राहत होते.

3 / 6
दिया सध्या वैभवसोबत हनिमूनला आहे. वैभव आणि त्याची पहिली पत्नी सुनैना यांना समीरा नावाची एक मुलगी आहे. समीरा सध्या दिया आणि वैभवसमवेत मालदीव्समध्ये आहे.

4 / 6
दिया मिर्झाने ऑक्टोबर 2014 मध्ये तिचा प्रियकर आणि व्यावसायिक भागीदार साहिल संघाशी लग्नगाठ बांधली. साहिल आणि दिया तब्बल पाच वर्ष प्रेमात होते. 2009 मध्ये दिया साहिलला एका कामानिमित्त पहिल्यांदा भेटली होती. भेटीचं रुपांतर मैत्री आणि पुढे प्रेमात झालं. पाच वर्षांच्या संसारानंतर दियाने साहिलसोबत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दियाने आपल्या घटस्फोटाची घोषणाही सोशल मीडियाच्या माध्यमातूनच 2019 मध्ये केली होती.

5 / 6
2000 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी दियाने मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल हा मानाचा किताब पटकावला. पुढच्याच वर्षी रहना है तेरे दिल में या सिनेमातून तिने बॉलिवूडचे दरवाजे ठोठावले. तेव्हापासूनच दियाने रसिकांच्या हृदयातही घर केलं. पुढे दम, तुमसा नही देखा, ब्लॅकमेल, लगे रहो मुन्नाभाई अशा सिनेमातून दिया झळकत राहिली. अभिनेत्री म्हणून लक्षात रहावी अशी एकही व्यक्तिरेखा दियाच्या वाटेला आली नाही, मात्र आपल्या चेहऱ्यावरील गोडव्यातून ती लक्षात राहिली.

6 / 6
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.