AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Reaction : कंगनाच्या निशाण्यावर आता दीपिका पादुकोण, म्हणाली कचरा विकू नकोस…, वाचा नेमका वाद काय?

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kanagana Ranaut) नेहमीच वादाच्या भोवऱ्यामध्ये असते. कंगना तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बऱ्याच वेळा अडचणीमध्ये देखील येते. कंगना रणौत अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे, जी प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडते.

Reaction : कंगनाच्या निशाण्यावर आता दीपिका पादुकोण, म्हणाली कचरा विकू नकोस..., वाचा नेमका वाद काय?
कंगना रानाैत, दीपिका पादुकोन वाद
| Updated on: Feb 13, 2022 | 1:25 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kanagana Ranaut) नेहमीच वादाच्या भोवऱ्यामध्ये असते. कंगना तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बऱ्याच वेळा अडचणीमध्ये देखील येते. कंगना रणौत अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे, जी प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडते. याशिवाय ती अनेक स्टार्सना टार्गेट करत असते. आता कंगनाच्या निशाण्यावर थेट दीपिका पादुकोणच (Deepika Padukone) आहे. कंगनाने दीपिकाच्या गहराइयां (Gehraiyaan) या चित्रपटाबद्दल मोठे भाष्य केले आहे. यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची दाट शक्यता आहे.

कंगना रानाैतची दीपिका पादुकोनवर टिका

त्याचे झाले असे की, कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दिग्गज अभिनेते मनोज कुमार आणि माला सिन्हा यांच्या चांद सी मेहबूबा या लोकप्रिय गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. हे गाणे हिमालय की लाप में या चित्रपटातील आहे. या गाण्यात मनोज कुमार नदीजवळ बसून गाणे म्हणतो आहे. त्याचवेळी माला डान्स करते. व्हिडिओ शेअर करताना कंगनाने लिहिले की, ‘मी देखील इतरांसारखीच आहे, पण मला रोमान्स समजतो.

kangana ranaut

नवीन युग, अर्जुन चित्रपटांच्या नावाखाली कचरा विकू नका. वाईट चित्रपट वाईट असतात. स्किन शो आणि पोर्नोग्राफी अशा चित्रपटांना वाचवू शकत नाही. कोणतीही खोल चर्चा नाही हे एक गहराइयां वाली गोष्ट आहे. खरं तर या चित्रपटात दीपिका आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यात काही इंटिमेट सीन्स आहेत, ज्याबद्दल कंगनाने भाष्य केले आहे.

कंगना परत एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता

रिअॅलिटी शो लॉक अपच्या कार्यक्रमादरम्यान एका पत्रकाराने कंगनाला दीपिकाबद्दल केलेल्या नकारात्मक कमेंटबद्दल विचारले असता, कंगना चांगलीच संतापली होती. कंगना म्हणाली होती, बघा, मी इथे त्यांच्यासाठी बोलायला आले नाही. जे स्वत:साठी लढू शकत नाहीत. ती स्वतःसाठी बोलू शकत नाही. मी येथे त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करू शकत नाही. कंगना नेहमीच दीपिकाला आपला निशाना बनवत असते. मात्र, कंगनाच्या टिकेवर शक्यतो दीपिका काही बोलत नाही.

संबंधित बातम्या : 

लता दीदींचं आयकॉनिक गाणं गाताना सलमान भावूक, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

शरद कपूरने केलं सहकलाकाराचं काम, वाट्याला विलनचे रोल, आता व्यवसाय तेजीत

‘इंडियन आयडल मराठी’कडून भारतरत्न लता मंगेशकर यांना स्वरांजली, लतादिदींच्या अजरामर गीतांचा नजराणा

Follow Us
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड