Happy Birthday Deepika Padukone | नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करून देणार होती मोठी पार्टी, जाणून घ्या का झाला दीपिका पदुकोणचा प्लॅन रद्द?

Happy Birthday Deepika Padukone | नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करून देणार होती मोठी पार्टी, जाणून घ्या का झाला दीपिका पदुकोणचा प्लॅन रद्द?
दीपिका पादुकोन

बॉलिवूडची सर्वात लाडकी अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. अलिबाग येथे आयोजित तिच्या आगामी 'Gehraiyaan' या चित्रपटाच्या ट्रेलरच्या लाँच कार्यक्रमात दीपिका तिचा वाढदिवस अतिशय ग्रँड पद्धतीने साजरा करणार असल्याचे वृत्त होते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jan 05, 2022 | 11:12 AM

मुंबई : बॉलिवूडची सर्वात लाडकी अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. अलिबाग येथे आयोजित तिच्या आगामी ‘Gehraiyaan’ या चित्रपटाच्या ट्रेलरच्या लाँच कार्यक्रमात दीपिका तिचा वाढदिवस अतिशय ग्रँड पद्धतीने साजरा करणार असल्याचे वृत्त होते. मात्र, आता बातमी आली आहे की ट्रेलर लाँच इव्हेंटसोबतच दीपिका पदुकोणचा ग्रँड सेलिब्रेशन बर्थडे प्लानही रद्द करण्यात आला आहे.

एका न्यूज पोर्टलचा हवाला देत ETimes ने आपल्या अहवालात ही पार्टी रद्द करण्याचे कारण सांगितले आहे. मुंबईतील कोरोनाव्हायरस प्रकरणांची वाढती संख्या पाहता हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, ‘Gehraiyaan’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट आता रद्द करण्यात आला आहे, त्यामुळे मुंबईत परतण्याऐवजी दीपिका पदुकोण तिचा पती रणवीर सिंहसोबत तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला रवाना झाली आहे, जिथे दोघेही एकत्र असणार आहेत.

‘Gehraiyaan’ चित्रपटाच्या टीममधील सदस्यांना कोरोनाची लागण

रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, चित्रपटातील अनेक लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या चित्रपटातील लोकांमध्ये दिग्दर्शक शकुन बत्रा यांच्या अनेक सहाय्यक दिग्दर्शकांचा समावेश आहे. सध्या, चित्रपटातील कलाकार कोरोना पॉझिटिव्ह असल्याबद्दल कोणतेही अपडेट नाही.

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. अर्जुन कपूर, सोनू निगम, अनिता राज, करीना कपूर खान, अमृता अरोरा, प्रेम चोप्रा, मृणाल ठाकूर यांसारख्या अनेक सेलिब्रिटींसह अनेक बॉलिवूड कलाकारही या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. यापैकी काही कलाकारांमध्ये सौम्य लक्षणे दिसली, तर अनेकांना कोणतीही लक्षणे नव्हती. शहरातील अनेक सेलिब्रिटी आणि सामान्य लोकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर, अनेक सिनेतारकांनीही लोकांना कोरोनाबाबत सतर्क राहण्याचे आणि शक्य ती सर्व खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

चित्रपटांची रांग

सध्या दीपिका पदुकोणच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिच्या हातात अनेक नवे प्रोजेक्ट आहेत. अभिनेत्रीचा आगामी चित्रपट ‘Gehraiyaan’ 25 जानेवारी रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाशिवाय दीपिकाने सिद्धार्थ आनंदचा ‘फायटर’ही साइन केला आहे, ज्यामध्ये ती पहिल्यांदा हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय ती शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटातही दिसणार आहे.

हेही वाचा :

Rajesh Pinjani | राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांची अकाली एक्झिट, मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा

कुणाची अंगठी तर कुणासाठी ब्रेसलेट, जाणून घ्या तुमच्या सुपरस्टार्सचा लकी चार्म कोणता?

नृत्यांगना ते अभिनेत्री…‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील ‘पिंकी’ने हेमा मालिनींसोबतही केलंय काम!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें