AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाची लस बनवणाऱ्या आदर पुनावाला यांच्या पत्नीचा Met Gala मधील लूक पाहून लोक हैराण, थेट विचारले…

आदर पुनावाला यांची पत्नी नताशा ही कायमच चर्चेत असते. बऱ्याच वेळा नताशा ही तिच्या ड्रेसमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येते. ड्रेसमुळे तिच्यावर टिका केली जाते. मात्र, या होणाऱ्या टिकेचा काहीच परिणाम हा नताशावर होत नाही. नव्या लूकमुळे नताशा ही सध्या जोरदार चर्चेत आहे.

कोरोनाची लस बनवणाऱ्या आदर पुनावाला यांच्या पत्नीचा Met Gala मधील लूक पाहून लोक हैराण, थेट विचारले...
| Updated on: May 02, 2023 | 6:01 PM
Share

मुंबई : कोरोना काळात एक नाव प्रचंड चर्चेत आले, ते म्हणजे आदर पुनावाला (Adar Poonawalla). कोरोनावरील वॅक्सीन बनवारी कंपनी म्हणजे सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया आहे. आदर पुनावाला यांनी भारताला कोरोनावरील वॅक्सीन उपलब्ध करून दिली. कोरोनानंतर आदर पुनावाला यांना एक खास ओळख मिळाली. सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) फक्त भारतामध्येच नाही तर विदेशात देखील कोरोनावरील वॅक्सीन दिल्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वीच पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट दिली. आदर पुनावाला यांची पत्नी सध्या तूफान चर्चेत आहे, त्याचे कारणही तेवढेच मोठे आहे.

आदर पुनावाला यांची पत्नी नताशा पुनावाला ही कायमच तिच्या फॅशनमुळे चर्चेत राहते. इतकेच नाही तर बऱ्याच वेळा तिच्यावर टिका देखील केली जाते. मेट गाला 2023 मध्ये आलिया भट्ट हिचा जलवा हा बघायला मिळाला आहे. यामध्ये डेब्यू हा आलिया भट्ट हिने केला आहे. आलिया भट्ट हिच्यामुळे सर्वांच्या नजरा या मेट गाला 2023 कडे होता. मात्र, आलिया भट्ट हिच्यापेक्षाही सध्या नताशा पुनावाला हिच्या नावाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

मेट गाला 2023 मध्ये नताशा पुनावाला ही देखील सहभागी झाली होती. नताशा पुनावाला हिची फॅशन पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. अतरंगी ड्रेसमध्ये नताशा पुनावाला ही दिसली आहे. मेट गालामध्ये नताशा सिल्वर रंगाच्या गाऊनमध्ये दिसली आहे. नताशा हिचा हा ड्रेस पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. नताशा हिने घातलेला हा ड्रेस अत्यंत चमकदार होता.

नताशा हिच्या या लूकची जोरदार चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. एकाने कमेंट करत लिहिले की, मॅडम तुम्ही हे नेमके काय घातले आहे? दुसऱ्याने लिहिले की, ही नेमकी कोणती इमारत आह? तिसऱ्याने लिहिले की, तुम्ही नक्कीच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करायला हवे, तुमच्यासाठी तिच एक योग्य जागा आहे. अजून एकाने लिहिले की, मला तुमचा हा खास ड्रेस खूप आवडला आहे.

आदर पुनावाला आणि नताशा यांचे लग्न 2006 मध्ये झाले असून यांना दोन मुले देखील आहेत. नताशा पुनावाला ड्रेसमुळे कायमच चर्चेत असते. मेट गालामध्ये गेल्या वर्षी देखील नताशा पुनावाला हटके स्टाईलमध्ये पोहचली होती. यावेळच्या लूकही देखील जोरदार चर्चा होताना दिसत आहे. काही लोक नताशाच्या फॅशनचे काैतुक करत आहेत तर काही लोक हे नताशा हिला टार्गेट करताना दिसत आहेत.

काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.