Death Anniversary | कॉलेजची पुस्तक विकून हिरो बनण्यासाठी मुंबईत आले होते अजित खान, वाचा अभिनेत्याशी संबंधित खास गोष्टी…

डोक्यावर बांधलेली जड पगडी आणि वक्र भारदस्त मिश्या असलेला हिंदी सिनेमाचा डाकू म्हणून 70 च्या दशकात अजित खान यांच्याकडे पाहिले गेले. काही चित्रपटांमध्ये अजितची ही शैली दाखवण्यात आली, तर दुसरीकडे सिनेमावर वर्चस्व गाजवणारे अजित अनेक चित्रपटांमध्ये सूट बूट घातलेले सुशिक्षित खलनायक म्हणून दिसले.

Death Anniversary | कॉलेजची पुस्तक विकून हिरो बनण्यासाठी मुंबईत आले होते अजित खान, वाचा अभिनेत्याशी संबंधित खास गोष्टी...
Ajit Khan
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 11:44 AM

मुंबई : डोक्यावर बांधलेली जड पगडी आणि वक्र भारदस्त मिश्या असलेला हिंदी सिनेमाचा डाकू म्हणून 70 च्या दशकात अजित खान यांच्याकडे पाहिले गेले. काही चित्रपटांमध्ये अजितची ही शैली दाखवण्यात आली, तर दुसरीकडे सिनेमावर वर्चस्व गाजवणारे अजित अनेक चित्रपटांमध्ये सूट बूट घातलेले सुशिक्षित खलनायक म्हणून दिसले. आज (22 ऑक्टोबर) अजित खान उर्फ ​​हमीद अली खान यांची पुण्यतिथी आहे. अजित यांची डायलॉग डिलीव्हरी इतकी जबरदस्त होती की, लोकांना त्यांच्या प्रेमात पडायला फारसा वेळ लागला नाही.

‘जंजीर’ चित्रपटातील ‘मोना डार्लिंग’  या सामान्य संवादाला त्यांनी वेगळ्या शैलीसह लोकप्रिय केला होता. अजित यांनी आपल्या हिंग्लिश उच्चारणाने सर्वांना वेड लावले होते. ‘कालीचरण’ चित्रपटातील ‘सारा शहर मुझे लॉयन के नाम से जानता है’ हा संवाद कोणीच विसरू शकत नाही. अजित यांनी हा संवाद पडद्यावर आपल्या अनोख्या शैलीने सदर केला की, सगळेच त्याच्या प्रेमात पडले.

अजित यांच्या रूपाने हिंदी चित्रपटसृष्टीला एक नवीन खलनायक मिळाला!

अजित यांच्या रूपात हिंदी चित्रपटसृष्टीला एक नवीन प्रकारचा खलनायक मिळाला होता, ज्यांनी आपल्या डायलॉग डिलीव्हरी आणि चेहऱ्याने लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. लोकांना हसवत आणि गुदगुल्या करत त्याच्या संवादांच्या अनोख्या शैलीमुळे लोकांमध्ये ते प्रसिद्ध झाले आणि या खलनायकाबद्दल कधी द्वेष वाटला नाही.

अजित यांच्याशी संबंधित काही मनोरंजक गोष्टी

  1. अजितचा जन्म 27 जानेवारी 1922 रोजी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे झाला होता, परंतु त्याचे बालपण आणि तारुण्य हैदराबादमध्येच गेले, कारण त्याचे वडील बशीर अली खान निजामाच्या सैन्यात हैदराबादमध्ये तैनात होते. ही योगायोगाची गोष्ट आहे, जेव्हा 1922 मध्ये लाहोरमध्ये अनारकली नावाचे नाटक लिहिले गेले, तेव्हा त्याच वर्षी त्यांचा जन्म झाला. अजित यांनी ‘मुघल-ए-आझम’मध्ये राजा दुर्जन सिंह सारखे महत्वाचे पात्र साकारले. कदाचित नियतीने ठरवले होते की, अजित हिरो बनतीलल आणि अकबराच्या याच कथेचा भाग बनतील.
  2. अजितला लहानपणापासूनच चित्रपट आणि अभिनयाची आवड होती. अभ्यासासाठी, त्यांचे वडील बशीर अली खान निजाम यांनी त्यांना महाविद्यालयात दाखल केले होते, परंतु अजित यांना अभ्यासात अजिबात रस नव्हता. जेव्हा, अजित यांना अजिबात अभ्यास करायला आवडत नाही, तेव्हा त्यांनी आपली पुस्तके विकली आणि त्या पैशातून, त्यांनी मुंबईला येणाऱ्या रेल्वेचे तिकीट खरेदी केले आणि स्वप्नांच्या शहरात पोहोचले.
  3. ‘मुगल-ए-आझम’ च्या दुर्जन सिंगच्या पात्रासाठी, पूर्वी के. आसिफ यांनी नकार दिला आणि नंतर काही वेळाने त्यांना फोन केला. तथापि, जेव्हा त्याला पहिल्यांदा दुर्जन सिंगच्या भूमिकेसाठी नाकारण्यात आले, तेव्हा ते खूप दुःखी झाले, पण जेव्हा के. आसिफ यांनी त्यांना पुन्हा फोन केला, तेव्हा ते या चित्रपटाला हो म्हणायला संकोचत होते.
  4. जेव्हा कमल अमरोही ‘अनारकली’ चित्रपट बनवत होते, तेव्हा त्यांनी अजितची प्रिन्स सलीम म्हणून निवड केली होती. जर हा चित्रपट बनला असता तर अजितची ओळख दुर्जन सिंह म्हणून झाली नसती, तर प्रिन्स सलीम म्हणून झाली असती.
  5. 5. चित्रपट निर्माते नासिर हुसेन यांना त्यांच्या ‘तुमसा नही देखा’ या हिट चित्रपटात शम्मी कपूर नव्हे तर अजितला कास्ट करायचे होते. पण अजित इतके प्रसिद्ध होता की, त्यांच्याकडे तारखा नव्हत्या. नासिर हुसेन यांनी त्यांच्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला, ज्याचा दावा राजकुमार केसवानी यांनी त्यांच्या मुघल-ए-आझम या पुस्तकात केला आहे.

हेही वाचा :

Sudha Chandran | ‘विमानतळावर सतत रोखलं जातं, वाईट वाटतं’, अभिनेत्री सुधा चंद्रन यांची पंतप्रधान मोदींना विनंती!

करण जोहरचा आयकॉनिक चित्रपट पाहून भडकल्या होत्या शबाना आझमी, फोन करून सुनावले खडे बोल!

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.