मुलींनो अजूनही वेळ आहे, वेळीच जाग्या व्हा… काहीही चुकीचं… अक्षरा सिंह हिचं आवाहन का? कुणासाठी?; पोस्ट व्हायरल

भोजपुरी सिनेमातील आघाडीची अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. तिच्या चाहत्यांना तर हा मोठा धक्का आहे. तिची अत्यंत जवळची मैत्रीण आणि प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंह हिला सुद्धा मोठा धक्का बसला आहे.

मुलींनो अजूनही वेळ आहे, वेळीच जाग्या व्हा... काहीही चुकीचं... अक्षरा सिंह हिचं आवाहन का? कुणासाठी?; पोस्ट व्हायरल
Akanksha DubeyImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 7:10 AM

मुंबई : प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री आणि मॉडेल आकांक्षा दुबेने आत्महत्या केली आहे. वाराणासीच्या सारनाथ परिसरातील एका हॉटेलमध्ये तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही. पण आकांक्षाने अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्वच कलाकार हादरून गेले आहेत. आकांक्षाला वैयक्तिक आयुष्यात प्रचंड संघर्ष करावा लागत होता यावर भोजपुरी कलाकारांना विश्वासच बसेनासा झाला आहे. आकांक्षाच्या मृत्यूमुळे भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहलाही धक्का बसला आहे. या बातमीमुळे ती पुरती हादरून गेली असून काय काय बोलावं आणि काय नाही? या प्रश्नाने तिला चिंताग्रस्त केलं आहे.

हे सुद्धा वाचा

आकांक्षा दुबेच्या मृत्यूनंतर अक्षरा सिंह हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने आकांक्षा दुबेचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आकांक्षासोबत तिची आई दिसत आहे. या फोटोत आकांक्षा स्माईल करताना दिसत आहे. परंतु, आता हे हास्य कधीच दिसणार नाहीये.

आईवडिलांचा विचार करा

आकांक्षाने आत्महत्या करण्याच्या एक दिवस आधी अक्षराला फोन करून तिच्याशी चर्चा केली होती. स्वत: अक्षराने आपल्या इन्स्टा पोस्टमधून त्याचा खुसाला केला आहे. अक्षरा या पोस्टमध्ये म्हणते, काय लिहू आणि काय बोलू हेच समजत नाहीये. काल तुझा मेसेज आला. दीदी तू वाराणासीला आहे का? अशी विचारणा केली. अन् आज असं घडलं. मला विश्वासच बसत नाहीये. ती एक धाडसी मुलगी होती. आई-वडिलांना चांगलं सुख देण्याचा ती प्रयत्न करत होती. मुलींनो, अजूनही वेळ आहे. जाग्या व्हा. काही चुकीचं करण्यापूर्वी आधी आपल्या आईवडिलांचा विचार करा, असं अक्षराने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पोलीस आले आणि…

दरम्यान, 25 मार्च रोजी आकांक्षा एका वाढदिवसाच्या पार्टीत सामील होण्यासाठी हॉटेलमधून निघाली होती. रात्री उशिरा ती हॉटेलला परत आली होती. सारनाथच्या हॉटेल सुमेंद्र रेसिडेन्सीच्या खोली क्रमांक 105मध्ये ती थांबली होती. तिच्या रुमचा दरवाजा सकाळी उशिरापर्यंत उघडला नाही. त्यामुळे पोलिसांना कळवण्यात आलं. पोलीस आल्यानंतर ही रुम मास्टर चावीने उघडण्यात आली. तेव्हा तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.