AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bell Bottom Trailer Review | 4 हायजॅकर्स, 210 प्रवाशांना वाचवण्याचं आव्हान, बेल बॉटमचा थरारक ट्रेलर पाहिलात ?

ट्रेलर रिलीज होताच दोन तासांच्या आत या ट्रेलरला तब्बल 4 लाख 50 हजारपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

Bell Bottom Trailer Review | 4 हायजॅकर्स, 210 प्रवाशांना वाचवण्याचं आव्हान, बेल बॉटमचा थरारक ट्रेलर पाहिलात ?
Bell-Bottom
| Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 9:52 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या ‘बेल बॉटम’ (Bell Bottom) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तत्पूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत दिल्लीमध्ये ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. रिलीज होताच दोन तासांच्या आत या ट्रेलरला तब्बल 4 लाख 50 हजारपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. येत्या 19 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Akshay Kumar starrer Bell Bottom film trailer has been released know what is story trailer review in marathi)

एकूण 3 मिनिट 29 सेकंदांचा आहे ट्रेलर

प्रदर्शित करण्यात आलेला बेल बॉटम चित्रपटाचा ट्रेलर एकूण 3 मिनिट 29 सेकंदांचा आहे. संपूर्ण ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट रोमहर्षक असणार असा अंदाज लावला जात आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेले दृश्य अतिशय थरराक असून अक्षयचे चाहते तसेच सिनेरसिकांना हा चित्रपट एकदातरी पाहावा असे नक्कीच वाटेल.

विमान हायजॅक प्रकरणावर चित्रपटाची कथा आधारित

बेल बॉटमचा ट्रेलर पाहून हा चित्रपट असा असावा याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात अक्षय कुमारने रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. 1984 मधील विमान हायजॅक प्रकरणावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. हायजॅक केलेले विमान तसेच त्यातील प्रवाशांना सुखरुप वाचवण्याचे आव्हान भारत सरकारपुढे आहे. त्यामुळे सरकार एका कर्तव्यदक्ष आणि चाणाक्ष अशा माणसाच्या शोधात आहे. त्यानंतर ही जबाबदारी बेल बॉटम नावाचा कोड असेल्या रॉ अधिकाऱ्यावर सोपवलेली आहे. याच रॉ अधिकाऱ्याची भूमिका अक्षय कुमारने साकारली आहे.

हिंदी, इंग्रजी, जर्मन, फ्रेंच भाषा अवगत

जवळपास साडेतीन मिनिटांच्या ट्रेलरमधून अक्षय कुमारची भूमिका कशा पद्धतीची असेल याबद्दल काही अदांज बांधले जात आहेत. बेल बॉटम कोड असलेला रॉचा अधिकारी हा अत्यंत हुशार आहे. त्याचे लग्न झालेले आहे. त्याची बुद्धी अतिशय तीक्ष्ण असून तो नॅशनल लेव्हलचा चेस प्लेअर आहे. तो गाणे शिकवतोय. तसेच हिंदी, इंग्रजी, जर्मन, फ्रेंच अशा अनेक भाषा त्याला अवगत आहेत.

210 प्रवाशांना सुखरुप सोडवण्याचे टास्क

हायजॅक केलेले हे विमान दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवताना चित्रपटाची कथा ही पाकिस्तान, दुबई, अबुधाबी तसेच लंडन अशा ठिकाणी फिरत असल्याचे दिसतेय. बेल बॉटम कोड असलेल्या रॉ अधिकाऱ्याकडे फक्त सात तास आहेत. या सात तासांत त्याला एकूण 4 हायजॅकर्सचा सामान करायचा आहे. तसेच 210 प्रवाशांना सुखरुप सोडवायचे आहे.

चित्रपटात दिग्गजांची भूमिका 

या चित्रपटात अक्षय कुमार, वाणी कपूर, हुमा कुरेशी, लाला दत्ता, अनिरुद्ध दवे, अदील हुसैन असा दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची निर्मिती वासू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख, मोनिषा अडवाणी आणि निखिल अडवाणी यांनी केली आहे. तर  रणजित तिवारी यांचं दिग्दर्शन आहे. हा चिपत्रट विनोद, थरार अशी सरमिसळ असलेला चित्रपट आहे.

इतर बातम्या :

अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी गहना वशिष्ठला झटका, कोर्टाकडून दिलासा नाहीच, नेमकं काय-काय घडलं?

Mitali Mayekar : हॉट अँड क्लासी, मिताली मयेकरचा हा किलर अंदाज पाहाच

Yo Yo Honey Singh पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, पत्नीने दाखल केली कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार

(Akshay Kumar starrer Bell Bottom film trailer has been released know what is story trailer review in marathi)

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...