बीजेपीच्या तिकीटावर विजयी झालेले अनिल शर्मा हे सलमान खान याचे अत्यंत जवळचे नातेवाईक

शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Dec 08, 2022 | 7:55 PM

विशेष म्हणजे अनिल शर्मा हे बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याचे अत्यंत जवळचे नातेवाईक आहेत.

बीजेपीच्या तिकीटावर विजयी झालेले अनिल शर्मा हे सलमान खान याचे अत्यंत जवळचे नातेवाईक

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये निवडणूकांचे वारे वाहू लागले आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका नुकताच पार पडल्या. गुजरातमध्ये बीजेपीची एकहाती सत्ता आलीये. तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. मात्र, या सर्वांमध्ये अनिल शर्मा यांच्या विजयाची चर्चा प्रचंड रंगली आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी सीटवर अनिल शर्मा यांचा विजय झाला असून यांनी ही निवडणूक बीजेपीकडून लढवली होती.

विशेष म्हणजे अनिल शर्मा हे बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याचे अत्यंत जवळचे नातेवाईक आहेत. अनिल शर्मा यांचा मुलगा आयुष शर्मा याने सलमान खान याची बहीण अर्पिता खान हिच्यासोबत लग्न केले आहे.

सलमान खान याची बहीण अर्पिता खान हिचे सासरे हे अनिल शर्मा असून त्यांचा आज या निवडणूकीमध्ये विजय झाला आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही मंडी सीटवरून त्यांचा विजय झाला होता.

BJP

आयुष शर्मा याने वडिलांच्या विजयानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सर्वांचे आभार मानले असून आपली खुशी जाहिर केलीये. आता ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

या निवडणूकीमध्ये अनिल शर्मा यांना 31 हजार 303 मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराला 21 हजार 297 मते मिळाली असून या जागेवर काँग्रेसच्या उमेदवार दुसऱ्या स्थानावर आहे.

सलमान खान हा सध्या बिग बाॅस 16 ला होस्ट करत आहे. तसेच 2023 मध्ये सलमान खानचे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला देखील येणार आहेत. विकेंडच्या वारमध्ये सलमान खान हा बिग बाॅसच्या घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास घेतो.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI