Arjun Rampal New Look | कुणी म्हणाले हॉलिवूड स्टार, तर कुणी म्हणाले म्हातारा! अर्जुन रामपालच्या नव्या लूकने चाहते अवाक्!

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याने आपल्या लूकचे असे काहीतरी केले, जे पाहून त्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. त्याने आपला लूक अशा प्रकारे बदलला आहे की, तो ओळखू देखील येत नाहीय! सध्या इंटरनेटवर त्याच्या या लूकची खूप चर्चा सुरु आहे.

Arjun Rampal New Look | कुणी म्हणाले हॉलिवूड स्टार, तर कुणी म्हणाले म्हातारा! अर्जुन रामपालच्या नव्या लूकने चाहते अवाक्!
अर्जुन रामपाल
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jun 18, 2021 | 1:47 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याने आपल्या लूकचे असे काहीतरी केले, जे पाहून त्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. त्याने आपला लूक अशा प्रकारे बदलला आहे की, तो ओळखू देखील येत नाहीय! सध्या इंटरनेटवर त्याच्या या लूकची खूप चर्चा सुरु आहे. अर्जुन रामपालने आपल्या केसांचा रंग बदलून प्लॅटिनम ब्लाँड केले आहेत. अर्जुन रामपालच्या या बदललेल्या लूकमुळे चाहते त्याला ओळखू देखील शकलेले नाहीत (Arjun Rampal New Look actor change his look with platinum blond hairs).

कुणी म्हणाले हॉलिवूड स्टार, तर कुणी म्हणाले म्हातारा!

अर्जुन रामपालचा एक व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे समोर आला आहे, तो पाहून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत कुणी त्याला दुर्बल झाल्याचे म्हटले आहे तर, कुणी हा व्हिडीओ पाहून तू म्हातारा दिसत आहेत, असे म्हटले आहे. तर त्यचे काही चाहते त्याला हॉलिवूड स्टार म्हणूनही संबोधत आहे. अर्जुन रामपालचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ :

प्लॅटिनम ब्लाँड हेअर लूक

अभिनेता अर्जुन रामपालचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये आपण पाहू शकता की, अर्जुन रामपाल प्लॅटिनम ब्लाँड केसांमध्ये खूपच वेगळा दिसत आहे, ज्यामुळे त्याची ओळख पटवणे देखील कठीण झाले आहे. त्याली ही स्टाईल सेलिब्रेटी केशभूषाकार अलीम हकीम यांनी तयार केली आहे, कारण हा व्हिडीओ त्याच्याच सलूनच्या बाहेरील आहे. या व्हिडीओमध्ये अर्जुन या सलूनमधून बाहेर पडताना दिसला आहे.

कंगनाच्या चित्रपटात दिसणार अर्जुन

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेता अर्जुन रामपाल ‘नेल पॉलिश’ चित्रपटात दिसला होता. त्याचबरोबर तो लवकरच कंगना रनौतच्या ‘धाकड’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 1 ऑक्टोबर 2021 रोजी प्रदर्शित होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

ड्रग्ज प्रकारणात नाव

अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनानंतर ड्रग्ज प्रकरण सुरू झाले. सुशांतच्या मृत्यूचा तपास सुरू झाला तेव्हा, त्यात ड्रग्स अँगल समोर आला. ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने सर्व सुत्र हाती घेतले. एनसीबीने सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची चौकशी केली, त्यानंतर एकामागून एक अनेक खुलासे झाले. अनेक ड्रग पेडलर्स पकडले गेले. यातच अर्जुन रामपाल याचे नाव देखील समोर आले होते.

21 डिसेंबररोजी अर्जुन रामपालची NCBकडून चौकशी करण्यात आली होती. ही चौकशी सुमारे 6 तास चालली. त्या दिवशी त्याला अटक होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण चौकशीनंतर अर्जुनला सोडून देण्यात आलं.

(Arjun Rampal New Look actor change his look with platinum blond hairs)

हेही वाचा :

‘खतरों के खिलाडी 11’च्या सेटवर मोठी दुर्घटना, अभिनेता वरुण सूदला गंभीर दुखापत

Munmun Dutta | ‘तारक मेहता…’च्या ‘बबिता’ला सुप्रीमकोर्टाकडून दिलासा, जातीवाचक अपशब्द वापरल्याने दाखल झाले होते FIR  

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें