AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“तिथे लोक मरतायत अन् इथे तू..”; रशिया-युक्रेन युद्धावर मीम शेअर करणाऱ्या अर्शदवर भडकले नेटकरी

रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine war) परिस्थितीवर अर्शदने (Arshad Warsi) गोलमाल चित्रपटावरील मीम शेअर केला. त्याच्या या मीमवर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

तिथे लोक मरतायत अन् इथे तू..; रशिया-युक्रेन युद्धावर मीम शेअर करणाऱ्या अर्शदवर भडकले नेटकरी
Arshad Warsi
| Edited By: | Updated on: Feb 25, 2022 | 4:04 PM
Share

गेल्या काही महिन्यांपासून वर्तविण्यात आलेली रशिया-युक्रेन युद्धाची (Russia-Ukraine crisis) भीती अखेर खरी ठरली. रशियाने गुरुवारी युक्रेनवर चौफेर हल्ले केले. या हल्ल्यानंतर युक्रेनचे सैन्य तीन बाजूंनी रशियन आक्रमकांशी लढत आहेत. तर हजारो लोकांना त्यांची घरं सोडून पळून जावं लागत आहे. एकीकडे काही बॉलिवूड कलाकार या परिस्थितीवर सोशल मीडियाद्वारे चिंता व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे अभिनेता अर्शद वारसीने (Arshad Warsi) या परिस्थितीवर त्याच्या गोलमाल (Golmaal meme) या चित्रपटावरील एक मीम शेअर केला. एकीकडे लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न असताना दुसरीकडे अर्शदने परिस्थितीची अशी खिल्ली उडवणं योग्य नाही, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी मीमवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर अखेर अर्शदने हे मीम डिलिट केलं.

रशिया-युक्रेन युद्धावर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर आपलं मत मांडलं. अभिनेता अर्शद वारसीने ट्विटरवर युद्धावरील एक मीम शेअर केला होता. हा मीम नेटिझन्सच्या पसंतीस उतरला नाही. अत्यंत असंवेदनशील ट्विट असल्याची टीका नेटकऱ्यांनी केली. अर्शदने शेअर केलेल्या मीममध्ये अजय देवगण, शर्मन जोशी, मुकेश तिवारी, तुषार कपूर आणि रिमी सेन होते. या कलाकारांनी साकारलेल्या भूमिकांना अमेरिका, रशिया, युक्रेन आणि युक्रेनमधील बंडखोरांच्या ताब्यात असलेला भाग अशी नावं देण्यात आली होती. ‘या चित्राला वेगळं स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. गोलमाल हा चित्रपट त्याच्या काळापेक्षा बराच पुढचा विचार करणारा होता’, असं त्यावर लिहिलं होतं. अर्शदच्या या मीमवर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

‘मला तुझ्या मीममधील विनोद समजला पण ही मस्करीची वेळ नाही. तिथे खरंच युद्ध सुरू आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘माफ कर, पण तुझ्याकडून अशा विनोदाची अपेक्षा नव्हती. तिथे अनेक निष्पाप लोकांच्या जीवनाचा प्रश्न आहे’, असं दुसऱ्याने लिहिलं. ‘मी कलाकार म्हणून तुमचा आदर करतो, पण युद्धाची मस्करी करणं योग्य नाही’, अशा शब्दांत एकाने सुनावलं. मीमवर या प्रतिक्रिया पाहून अर्शदने त्याचं ट्विट डिलिट केलं.

संबंधित बातम्या: रशिया यूक्रेनमध्ये कीव शहरावरुन संघर्ष, रशियन फौजांना रोखण्यासाठी नद्यांवरील पूल उडवले

संबंधित बातम्या: जड अंत:करणानं पत्नी आपल्या पतीला देतेय निरोप, रशिया-युक्रेन युद्धादरम्यान Viral झाला Emotional video

संबंधित बातम्या: गोळीबार, बॉम्बफेक सुरु असतानाही युक्रेनमध्ये सुरु आहे अभिनेत्याचं काम

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...