औरंगजेब मरताना काय विचार करत होता? अखेरचे शब्द काय बोलला?; शब्द ऐकून तुम्हीही…
छावा सिनेमामुळे औरंगजेबाच्या आयुष्याच्या शेवटच्या काळातील घटना पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्याच्या अत्याचारापासून ते त्याच्या मृत्यूच्या क्षणातील चिंता आणि शेवटचे शब्द काय होते, याचीच चर्चा आपण करणार आहोत. औरंगजेबाच्या धार्मिक कट्टरतेपासून ते त्याच्या अखेरच्या क्षणांच्या वेदनांपर्यंतचा ऊहापोह करणार आहोत.

‘छावा’ या सिनेमामुळे पुन्हा एकदा इतिहासाला उजाळा मिळाला आहे. छत्रपती संभाजी राजे यांचं जीवन चरित्र, त्यांचा पराक्रम आणि त्यांचं बलिदान पुन्हा एकदा लोकांसमोर आलं आहे. या सिनेमाला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. छावा सिनेमात संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिका साकारणाऱ्या विक्की कौशलच्या अभिनयाचंही कौतुक केलं जात आहे. तर औरंगजेबची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाचंही प्रेक्षक कौतुक करत आहे. अक्षय खन्नाने खुंखार औरंगजेब जसाच्या तसा उभा केला आहे. त्यामुळेच छावा सोबत औरंगजेबही इंटरनेटवर चांगलाचा ट्रेंड करत आहे. औरंगजेबाला अखेरपर्यंत मराठ्यांना जिंकता आलं नव्हतं. त्याचा मृत्यू महाराष्ट्रातच झाला. पण त्याला मराठ्यांना हरवता आलं नाही. मरताना औरंगजेबाची परिस्थिती कशी होती? त्याचे अखेरचे शब्द काय होते? (Aurangzeb’s last words)याचाच घेतलेला हा आढावा. ...
