अभिनेत्री आर्या बॅनर्जी मृत्यू प्रकरणी मोठा खुलासा, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये ‘हे’ आले समोर!

डर्टी' आणि 'लव्ह सेक्स और धोखा' सारख्या हिंदी चित्रपटांत काम करणारी अभिनेत्री आर्या बॅनर्जी हीच्या मृत्यू बाबतीत, पोलिसांनी एक मोठा खुलासा केला आहे.

अभिनेत्री आर्या बॅनर्जी मृत्यू प्रकरणी मोठा खुलासा, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये 'हे' आले समोर!

मुंबई : ‘डर्टी’ आणि ‘लव्ह सेक्स और धोखा’ सारख्या हिंदी चित्रपटांत काम करणारी अभिनेत्री आर्या बॅनर्जी हीच्या मृत्यू बाबतीत, पोलिसांनी एक मोठा खुलासा केला आहे. कोलकाता पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की, प्रख्यात सतारवादक निखिल बंद्योपाध्याय यांची मुलगी आर्या शुक्रवारी घरी मृत अवस्थेत आढळली होती. आज तिचा पोस्टमार्टम अहवाल आला आहे. त्यामध्ये असे आले की, तिने खूप जास्त प्रमाणात मद्यपान केले होते. (Big revelation in actress Arya Banerjee’s death case)

डॉक्टरांनी तिच्या हत्येबद्दलचा संशय फेटाळून लावला आहे. शुक्रवारी सकाळी अभिनेत्रीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर ती मदत मागण्यासाठी जागेवरून उठली आणि पडली असावी. ते म्हणाले की, शवविच्छेदन तपासणीत असेही सांगण्यात आले की, तिच्या शरीरावर सापडलेले रक्त पडल्यानंतरच आले असावे. यामध्ये सर्वांत महत्वाचे म्हणजे आर्याच्या पोटात सुमारे दोन लिटर अल्कोहोल सापडले आहे. पोलिसांना तिच्या घरातून दारूच्या अनेक बाटल्या आणि रक्ताच्या भरलेले कागद सापडले आहेत.

डर्टी चित्रपटात विद्या बालनबरोबर काम करणारी अभिनेत्री आर्या बॅनर्जीचे निधन झाले आहे. ती 33 वर्षांची होती. ती कोलकाताच्या जोधपुर पार्क भागात एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. काल पोलिसांनी दरवाजा तोडून अभिनेत्रीचा मृतदेह ताब्यात घेतला होता. आर्याने तिची खोली आतमधून बंद केली होती. आजूबाजूच्या लोकांनी तिला आवाज दिले फोन केले मात्र, आतमधून कुठलाच प्रतिसाद येत नसल्यामुळे त्यांनी पोलीसांना याबाबत माहिती दिली होती. पोलिसांनी काल अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला होता आर्या तिच्या अपार्टमेंटमध्ये एकटीच राहत होती. तिला कुत्र्यांची खूप आवड होती. तिच्याकडे एक कुत्रा देखील होता. सन 2020 मध्ये बॉलिवूड क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार जगाला सोडून गेले आहेत. इरफान खान, ऋषी कपूर, सुशांतसिंग राजपूत, एसपी बालसुब्रमण्यम यांच्यासह अनेक नावे आहेत.

संबंधित बातम्या : 

जगभरातील कलाकारांसाठी महत्त्वाची ‘Google Most Search List’ काय आहे?

रेमो डिसूझाच्या प्रकृतीत सुधारणा, नृत्यदिग्दर्शक अहमद खान यांनी दिली माहिती

(Big revelation in actress Arya Banerjee’s death case)

Published On - 4:02 pm, Sun, 13 December 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI