John Abraham Net Worth : अभिनयच नाही तर व्यवसायातही अव्वल अभिनेता जॉन अब्राहम, जाणून घ्या अभिनेत्याच्या नेटवर्थबद्दल…

बॉलिवूडचा धडाकेबाज अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) सध्या त्याच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये सातत्याने व्यस्त आहे. अभिनेत्याला सुरुवातीपासूनच इंडस्ट्रीच्या लोकांपासून दूर राहणे आणि स्वतःच्या कामाकडे लक्ष देणे आवडते.

John Abraham Net Worth : अभिनयच नाही तर व्यवसायातही अव्वल अभिनेता जॉन अब्राहम, जाणून घ्या अभिनेत्याच्या नेटवर्थबद्दल...
जॉन अब्राहम

मुंबई : बॉलिवूडचा धडाकेबाज अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) सध्या त्याच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये सातत्याने व्यस्त आहे. अभिनेत्याला सुरुवातीपासूनच इंडस्ट्रीच्या लोकांपासून दूर राहणे आणि स्वतःच्या कामाकडे लक्ष देणे आवडते. जॉन अभिनयाच्या बाबतीत खूप अव्वल आहे, मग तो अॅक्शन चित्रपट असो, विनोदी चित्रपट असो किंवा थ्रिलर चित्रपट असो, जॉन प्रत्येक चित्रपटाच्या प्रत्येक पात्रामध्ये स्वतःला उत्तम प्रकारे फिट करतो. ज्यामुळे बॉलिवूडमध्ये अभिनेत्याला खूप पसंत केले जाते.

चित्रपटांव्यतिरिक्त, जॉनचे फूड जॉइंट्सपासून वोडका ब्रँडपर्यंत अनेक मोठे व्यवसाय आहेत. चला तर, जाणून घेऊया अभिनेत्याचे एकूण नेटवर्थ किती आहे.

Caknowledge.com च्या मते, जॉन अब्राहमचे एकूण नेटवर्थ 34 दशलक्ष डॉलरच्या जवळपास आहे, जे भारतीय रुपयांमध्ये सुमारे 251 कोटी इतके आहे. जॉन मुंबईतील त्याच्या पेंट हाऊसमध्ये राहतो. त्याच्या कमाईमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते. जॉन चित्रपटांपेक्षा ब्रँडचा प्रचार करून जास्त पैसे कमवतो. देणग्या देण्यातही जॉनचा क्रमांक आघाडीवर आहे. त्याच्या उत्पन्नाचा एक मोठा भाग विविध धर्मादाय कार्यक्रम आणि मोहिमांसाठी दान केला जातो. याशिवाय जॉन बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कर भरणारा अभिनेता आहे.

जॉनची कमाई आणि व्यवसाय

जॉन दरमहा जवळपास 1 कोटी 20 लाख रुपये कमावतो, तर संपूर्ण वर्षात 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करतो. जॉनच्या इतर व्यवसायांबद्दल बोलायचे तर, अभिनेत्याचे स्वतःचे रेस्टॉरंट आहे ज्याचे नाव ‘फॅट अब्राहम बर्गर’ असे आहे. त्याची स्वतःची फुटबॉल टीम देखील आहे, जिचे नाव ‘मुंबई एंजल्स’ आहे. जॉनकडे वोडकाचा ब्रँडही आहे, त्याच्या व्होडका ब्रँडचे नाव ‘प्योर वंडर अब्राहम’ आहे. याशिवाय त्याच्याकडे स्वतःच एक परफ्यूमचा ब्रँड देखील आहे.

जॉनचे आलिशान घर

जॉन मुंबईच्या वांद्रे परिसरात एका आलिशान डुप्लेक्स फ्लॅटमध्ये राहतो. जॉनचे घर तब्बल 5,100 चौरस फुटांवर पसरलेले आहे. जॉन आपल्या संपूर्ण कुटुंबासह या घरात राहतो.

गाड्यांची आवड

बॉलिवूडमध्ये जेव्हाही गाड्यांची चर्चा होते, तेव्हा जॉन अब्राहमच्या नावाचा उल्लेख नक्कीच केला जातो. अभिनेत्याकडे अतिशय महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. यामध्ये कार आणि बाईक्सचा समवेश आहे.

कार

Lamborghini Gallardo

Audi Q3 (Audi Q3)

Audi Q7 (Audi Q7)

बाईक

Yamaha R1

Yamaha VMAX

Suzuki Hayabusa

2003 मध्ये जॉनने ‘जिस्म’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर अभिनेत्याचे नाव त्याची सह-कलाकार बिपाशा बसू हिच्याशी जोडले गेले. परंतु, काही वर्षांनी दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर जॉनने त्याची मैत्रीण प्रिया रुंचालसोबत 2014 मध्ये लग्नगाठ बांधली.

(Bollywood Actor John Abraham Net Worth)

हेही वाचा :

भारत देश सोडून दुबईला जाणार नवाजुद्दीन सिद्दिकीचं कुटुंब! पत्नी आलियाने सांगितलं ‘हे’ कारण

धर्माच्या भिंती ओलांडत एकमेकांशी लग्नगाठ बांधणारे दीपिका-शोएब, जाणून घ्या त्यांच्या प्रेमकथेबद्दल…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI