प्रसिद्ध दिग्दर्शक रवि टंडन यांचं निधन; रविनाची वडिलांसाठी भावूक पोस्ट, म्हणाली, “आप हमेशा मेरे साथ चलेंगे पापा…”

बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनचे वडील आणि प्रसिद्ध दिग्दर्शक रवी टंडन यांचं निधन झालं आहे. रवी टंडन यांनी वयाच्या 87 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

प्रसिद्ध दिग्दर्शक रवि टंडन यांचं निधन; रविनाची वडिलांसाठी भावूक पोस्ट, म्हणाली, आप हमेशा मेरे साथ चलेंगे पापा...
रविना टंडन, रवी टंडन
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 5:41 PM

आयेशा सय्यद, मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनचे (Raveena Tandon) वडील आणि प्रसिद्ध दिग्दर्शक रवी टंडन (Ravi Tandon) यांचं निधन झालं आहे. रवी टंडन यांनी वयाच्या 87 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. रविना टंडनने स्वतः याबाबतची माहिती दिली आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिनं आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती तिच्या वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे. “बाबा, तुम्ही नेहमी माझ्यासोबत असेच चालत असाल. मी नेहमी तुझ्यासारखंच राहण्याचा प्रयत्न करत राहिल. मी तुमची साथ कधीच सोडणार नाही. लव्ह यू बाबा”, असं रविना तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाली आहे. रवी टंडन यांच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये शोक व्यक्त होत आहे.

रविना टंडनची इन्स्टाग्राम पोस्ट

रविना टंडनचे वडील आणि चित्रपट दिग्दर्शक रवी टंडन यांचं निधन झालं आहे. रविना टंडनने स्वतः याबाबतची माहिती दिली आहे. इंस्टाग्राम अकाउंटवर तिनं आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. “बाबा, तुम्ही नेहमी माझ्यासोबत असेच चालत असाल. मी नेहमी तुझ्यासारखंच राहण्याचा प्रयत्न करत राहिल. मी तुमची साथ कधीच सोडणार नाही. लव्ह यू बाबा”, असं रविना तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाली आहे.

रवि टंडन यांनी दिग्दर्शित केलेले सिनेमे

रविना टंडनचे वडील रवी टंडन हे बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. नजराना, मुकद्दर, मजबूर, निर्माण ही त्यांच्या निवडक चित्रपटांची नावं सांगता येतील. याशिवाय त्यांनी अनहोनी आणि एक मैं और एक तू या चित्रपटांची निर्मितीही केली आहे. रवी टंडन यांनी वीणा यांच्याशी लग्न केलं. त्याना रवीना आणि राजीव ही दोन मुलं आहेत. रविना अभिनेत्री आहे तर राजीवदे दिग्दर्शक आणि निर्माता आहेत.

रविना आणि तिच्या बाबांच खास नातं रविना आणि तिचे वडिल रवी टंडन या दोघांचं नातं वडील-मुली पेक्षा मित्र-मैत्रिणीचं अधिक होतं. रविना आपल्या बाबांच्या खूप जवळ होती त्यांच्या जाण्याने रविनाला दुखावली गेली आहे.

संबंधित बातम्या

‘लोच्या झाला रे’ परदेशातही प्रदर्शित होणार, चित्रपटाची टीम सातासमुद्रापार धम्माल करणार

Vaidehi Parashurami : वैदेही परशुरामी झाली ‘गुलाबो’, Weekend mood मधले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर

Lock Up Show : कंगना रनौतच्या ‘लॉकअप’चा टीझर आऊट, ‘या’ तारखेपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.