AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडवर शोककळा, प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले आहे. आज (गुरुवार) त्यांनी मुंबईतील नानावटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

बॉलिवूडवर शोककळा, प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड
Sulakshana Pandit Death
| Updated on: Nov 06, 2025 | 11:10 PM
Share

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले आहे. आज (गुरुवार) त्यांनी मुंबईतील नानावटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून खूप आजारी होत्या. तसेच त्या गेल्या 16 वर्षांपासून अंथरुणावर होत्या. त्यांच्या निधनामुळे चित्रपट आणि संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या कारकीर्दीबाबत माहिती जाणून घेऊयात.

प्रेक्षकांच्या मनावर केले राज्य

प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांनी 70 आणि 80 च्या दशकात आपल्या मधुर आवाजाने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घातली होती. सुलक्षणा पंडित यांचा जन्म 1954 मध्ये एका प्रतिष्ठित संगीत कुटुंबात झाला होती. त्या दिग्गज शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या भाची होत्या. सुलक्षणा यांचे बंधू जतिन-ललित ही प्रसिद्ध संगीतकार जोडी होती.

वयाच्या नवव्या वर्षांपासून गायनाला सुरुवात

सुलक्षणा पंडित यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून गायनाला सुरुवात केली होती. 1967 साली त्यांनी पार्श्वगायनाला सुरुवात केली. संकल्प चित्रपटातील “तू ही सागर है तू ही किनारा” या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

प्रसिद्ध चित्रपटांमध्ये केले काम

गायनासोबत सुलक्षणा पंडित यांनी अभिनय श्रेत्रातही महत्त्वाचे योगदान दिले. त्यांनी अभिनेता संजीव कुमार यांच्यासोबत उलझन आणि संकोच या चित्रपटांमध्ये काम केले. सुलक्षणा यांची बॉलिवूड कारकीर्द संगीत आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रात विस्तारलेली होती. कारकीर्दीत मिळालेल्या यशानंतरही त्यांचे वैयक्तिक जीवनात मोठी आव्हाने होती. कारण त्यांनी लग्न केले नाही.

लग्न केले नाही

संपूर्ण आयुष्यभर त्या एकट्या होत्या. सुलक्षणा यांचे संजीव कुमारसोबत अफेअर होत, मात्र ही प्रेमकथा अधुरीच राहीली, त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम झाला. बॉलिवूडमधून बाहेर पडल्यानंतर सुलक्षणा यांना विविध आजारांनी ग्रासले, तसेच त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. सुलक्षणा यांच्या निधनाने चित्रपट आणि संगीत क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.