Preity Zinta | अंडरवर्ल्डच्या धमक्यांनंतरही न घाबरता प्रिती झिंटाने नोंदवला होता जबाब, वाचा नेमकं काय घडलं…

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाला (Preity Zinta) अजूनही तिचे चाहते ‘डिंपल गर्ल’च्या नावाने ओळखतात. प्रितीने तिच्या कारकिर्दीत नेहमीच अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले होते. प्रितीने नेहमीच प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम केले.

Preity Zinta | अंडरवर्ल्डच्या धमक्यांनंतरही न घाबरता प्रिती झिंटाने नोंदवला होता जबाब, वाचा नेमकं काय घडलं...
प्रिती झिंटा
Harshada Bhirvandekar

| Edited By: अनिश बेंद्रे

Apr 16, 2021 | 8:55 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाला (Preity Zinta) अजूनही तिचे चाहते ‘डिंपल गर्ल’च्या नावाने ओळखतात. प्रितीने तिच्या कारकिर्दीत नेहमीच अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले होते. प्रितीने नेहमीच प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम केले. अभिनेत्री प्रीती झिंटा कधीही आपल्या गोष्टी बिनधास्तपणे सार्वजनिक ठिकाणी मांडण्यास कुचराई करत नाही. अलीकडेच प्रितीबद्दल एक बातमी समोर आली असून, या जाणून चाहते देखील आश्चर्यचकित होतील (Brave Actress Preity Zinta she fight against threats of underworld).

गेल्या अनेक काळापासून प्रिती झिंटा चित्रपटांमध्ये दिसली नाही. पण, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमी  चाहत्यांशी संवाद साधत राहते. प्रिती झिंटा चित्रपटांमधील तिच्या जबरदस्त भूमिकांसाठी ओळखली जात असली, तरी ती खऱ्याखुऱ्या आयुष्यातही तितकीच शूर आहे.

प्रितीला मिळालेल्या अंडरवर्ल्डच्या धमक्या

बातमीनुसार, ‘चोरी चोरी चुपके चुपके’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांना अंडरवर्ल्डकडून अनेकदा धमकीचे कॉल आले होते. शाहरुख खान, सलमान खान, संजय गुप्ता, महेश मांजरेकर, निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशन आणि इतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे पूर्वीचे वक्तव्य मागे घेतले होते, पण अभिनेत्री प्रिती झिंटा मात्र तिच्या म्हणण्यावर ठाम होती.

रेडिफ डॉट कॉमच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील सत्र न्यायालयाच्या सुनावणीवेळी प्रिती झिंटाला एका व्यक्तीचा फोन आल्याचा खुलासा झाला असून, तो म्हणाला, ‘मी भाईची भाईची माणूस, रदमी रझाक बोलत आहेत आणि मला 50 लाख हवे आहेत (Brave Actress Preity Zinta she fight against threats of underworld).

चित्रपट व्यवसायात गुंतले होते अंडरवर्ल्डचे पैसे

बातमीनुसार, अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचे पैसे या चित्रपटात खर्च झाले होते, तर कागदावर मात्र हे पैसे भरत शाहचे असल्याचे नोंदवण्यात आले होते. धमकी दिल्यानंतरही अभिनेत्री प्रिती झिंटा आपल्या मतावर टिकून होती. कोर्टात साक्ष देण्यासाठी ती हजार झाली होती. प्रिती झिंटाने कोर्टात कबूल केले होते की तिला अंडरवर्ल्डकडून धमकीचे कॉल येत आहेत आणि पैशांचीही मागणी केली जात आहे. हे प्रकरण अंडरवर्ल्डशी संबंधित असल्याने प्रिती झिंटाचे हे विधान कॅमेर्‍यावर रेकॉर्ड करण्यात आले होते.

यावेळी प्रिती झिंटा म्हणाली की, ‘मी खूप घाबरले होते आणि खूप टेन्शनमध्ये होते. त्यावेळी मी या चित्रपटाच्या निर्मात्याला, नाझीम रिझवीला भेटले. त्याने काळजी करू नका असे सांगितले आणि सांगितले की सर्व काही ठीक होईल. त्याने मला त्याचा मोबाईल क्रमांक दिला व सांगितले की, आणखी काही समस्या असल्यास मला या वर कॉल करा.’

नंतर जेव्हा पोलिसांनी अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील आणि फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित चार लोक यांच्यात टेलिफोन संभाषण रेकॉर्ड केले, तेव्हा चित्रपट फायनान्सर भरत शाह, निर्माता नसीम रिझवी, त्याचा सहाय्यक अब्दुल रहीम अल्लाह बख्श आणि दुबईचे ज्वेलर मोहम्मद शमशुद्दीन या चार लोकांना आरोपी ठरवण्यात आले होते.

(Brave Actress Preity Zinta she fight against threats of underworld)

हेही वाचा :

‘आजी’ शर्मिला टागोरने अद्यापही नाही पाहिला ‘छोट्या नवाबा’चा चेहरा, करीना कपूरने सांगितले कारण…

Anupam Kher | आता फक्त किरणची काळजी, अनुपम यांनी अमेरिकन वेबसीरीजला म्हटले ‘गुडबाय’!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें