Chakda Xpressमधून कमबॅक करणारी अनुष्का शर्मा ट्रोल! यूझर्स म्हणतायत, तुझ्यापेक्षा…

Chakda Xpressमधून कमबॅक करणारी अनुष्का शर्मा ट्रोल! यूझर्स म्हणतायत, तुझ्यापेक्षा...
अनुष्का शर्मा/झुलन गोस्वामी

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) दीर्घ विश्रांतीनंतर पडद्यावर पुनरागमन करत आहे. तिचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'चकदा एक्स्प्रेस'(Chakda Xpress)चं शूटिंग सुरू झालं आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रदीप गरड

Jan 06, 2022 | 3:58 PM

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) दीर्घ विश्रांतीनंतर पडद्यावर पुनरागमन करत आहे. तिचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘चकदा एक्स्प्रेस'(Chakda Xpress)चं शूटिंग सुरू झालं आहे. अनुष्का शर्मा आणि नेटफ्लिक्स (Netflix)इंडियानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवरून ही माहिती दिलीय. या चित्रपटात अनुष्का शर्मानं प्रसिद्ध महिला क्रिकेटर झुलन गोस्वामी(Jhulan Goswami)ची भूमिका साकारलीय. मात्र, सोशल मीडिया यूजर्सनं अनुष्का शर्माला तिच्या लूकवरून ट्रोल (Troll) करण्यास सुरुवात केलीय. कास्टिंग डायरेक्टरनं माफी मागावी, असंही यूझर्सनी म्हटलं आहे.

हॅशटॅग्सच्या कमेंट्सचा पूर चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा कोणत्याही कोनातून झुलन गोस्वामीसारखी दिसत नाही, असं ट्विटर यूझर्सचं म्हणणं आहे. ना तिची उंची झुलनसारखी आहे, ना तिचा लूक झुलनशी जुळणारा आहे. याशिवाय लोकांनी अनुष्काला बंगाली उच्चारण नीट न जुळल्यानंही ट्रोल केलंय. ट्विटरवर #AnushkaSharma, #JhulanGoswami आणि #ChakdaXpress या हॅशटॅग्सच्या कमेंट्सचा पूर आलाय. त्याआधी पाहूया चित्रपटाचा टीझर…

‘…तरीही शुभेच्छा’ नेटफ्लिक्सइंडियाच्या टीझरवर टिप्पणी करताना एका ट्विटर यूझरनं लिहिलंय, ‘या ट्रेलरमध्ये असं काही नाही की मी झुलनचा बायोपिक पाहतोय. अनुष्काचा बंगाली उच्चारही समजला नाही. तरीही या चित्रपटाला माझ्या शुभेच्छा.’ त्याचवेळी आणखी एका यूझरनं कमेंट करत लिहिलंय, की चित्रपटात झूलन गोस्वामीला घेतलं असतं तर तिनं अनुष्कापेक्षा चांगला अभिनय केला असता.’ दुसऱ्या यूझरनं कमेंट करताना लिहिलं, होय, अनुष्का… कुठूनही झूलनसारखी दिसत नाही, ‘ना उंची तिच्यासारखी, ना तिचा रंग तिच्यासारखा.’ काही प्रतिक्रिया पाहू या…

विराटशी लग्न केल्यानंतरचा पहिलाच सिनेमा अनुष्काचा शेवटचा चित्रपट ‘झिरो’ हा 2018मध्ये रिलीज झाला होता. क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्रीचा हा पहिलाच चित्रपट आहे. मात्र त्याचं कौतुक करण्याऐवजी लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केलीय.

Divorce | 9 वर्ष संसार, 9 महिन्यांपूर्वीच काडीमोड! आमीर-संजीदाची कुणालाच कानोकान खबर कशी नाही?

Video : जावेद हबीबनं केस कापताना हे काय केलं? महिला संतापली, म्हणाली…

सात फेरे घेतल्यानंतर वधू-वराचा एक मजेदार गेम; पंडितजींनी काय चॅलेंज दिलं? पाहा Video

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें