संजय लीला भन्साळींच्या ‘हिरामंडी’वर पाकिस्तानी कलाकारांची टीका, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

बॉलिवूडचे दिग्गज चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट ‘हिरामंडी’वर काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'हिरामंडी' (Hiramandi) ही वेब सीरीज नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

संजय लीला भन्साळींच्या ‘हिरामंडी’वर पाकिस्तानी कलाकारांची टीका, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
Sanjay Leela Bhansali

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट ‘हिरामंडी’वर काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘हिरामंडी’ (Hiramandi) ही वेब सीरीज नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. चित्रपटाची कथा पाकिस्तानातील लाहोरच्या रेड-लाईट एरियाशी संबंधित आहे, ज्याला ‘शाही मोहल्ला’ असेही म्हटले जाते. कथेचा केंद्रबिंदू येथे काम करणाऱ्या सेक्स वर्कर्सच्या जीवनावर आधारित आहे. संजय लीला भन्साळींच्या या ड्रीम प्रोजेक्टमुळे पाकिस्तानी सेलेब्स संतप्त झाले आहेत. तथापि, ते त्यांच्या चित्रपट उद्योगालाही प्रश्न विचारत आहे की, अशा कथा पाकिस्तानी चित्रपट निर्मात्यांनी दाखवल्या पाहिजेत.

अभिनेत्री उशाना शहा हिने संजय लीला भन्साळींच्या ‘हिरामंडी’ या ड्रीम प्रोजेक्टवर आपली भूमिका मांडली आहे आणि म्हटले आहे की, भारतीय दिग्दर्शकाने पाकिस्तानातील एखाद्या भागावर आधारित वेब सीरीज बनवू नये. ती म्हणते की, ‘हिरामंडी’ त्यांच्यासाठी नाही. त्यांनी त्यावर चित्रपट किंवा मालिका बनवू नये. हे खूप त्रासदायक आहे. तिने एका ट्विटमध्ये लिहिले की, “संस्कृती सहकार्य एक गोष्ट आहे पण ती अन्यायकारक आहे. आमची कॉपी केल्याने प्रोजेक्टची विश्वासाहर्ता नष्ट होईल! भारताकडे चित्रपटासाठी समृद्ध संस्कृती आणि इतिहास आहे, हे त्यांच्यासाठी नाही!” दुसऱ्या एका ट्विटमध्ये उशाना शहा यांनी म्हटले आहे की, संजय लीला भन्साळी यांनी हिरामंडीवर चित्रपट बनवणे हे पाकिस्तानी दिग्दर्शकाने महाभारतावर चित्रपट बनवण्यासारखे आहे.

आमच्या कथा आम्ही कधी दाखवणार?

पाकिस्तानी स्टार मानशा पाशाने ट्विटरवर संजय लीला भन्साळी यांच्या लाहोरमध्ये  असलेल्या ‘हिरामंडी’वर आधारित असलेल्या या चित्रपटाबद्दल बोलताना लिहिले की, “भारत लाहोर आणि प्रसिद्ध हिरामंडीवर चित्रपट बनवत आहे. कारण आपण अशा देशात राहतो जिथे काल्पनिक कथा बऱ्याचदा सेन्सॉर केल्या जातात आणि प्रत्येकजण ‘नैतिकदृष्ट्या स्वीकार्य’ फिक्शन काय आहे किंवा नाही यावर वाद घालतो, इतर लोकांना आपल्या देशाच्या मूळ कथा शेअर करण्याची परवानगी आहे. ती घेण्याची संधी मिळते. ते त्यांचे ब्रँड करतात, त्यांना उर्वरित जगाला विकतात. शेवटी जे उरले आहे ते दुसऱ्याच्या तोंडातून निघणाऱ्या आपल्या कथा असतील. दुःख.”

पाकिस्तानी अभिनेता आणि होस्ट यासीर हुसेन म्हणाला की, “हिरामंडी लाहोर येथे आहे आणि हा चित्रपट भारतीय बनवत आहेत. आणि मग आम्ही टीका करू की, भारतीय कसे खोटे आख्यान दाखवतात. अल्लाहला माहित आहे की आपण अशा विषयांवर कधी बोलू, आपण आपल्या कथा कधी सांगू.”

आमचे पैसे फुकट जातील!

मॉडेल आणि अभिनेत्री हिरा तारिन म्हणाली, “आम्ही अशा विषयांवर चित्रपट बनवत नाही, कारण जर आम्ही तसे केले तर फतवा जारी केला जाईल आणि निर्मात्यांचे पैसे फुकट जातील. तुम्हाला खरोखर असे वाटते की पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटरी अथॉरिटी (PEMRA) हिरामंडी किंवा अशा इतर कोणत्याही विषयाची ‘वास्तविक’ कथा सहन करू शकते? ”

हेही वाचा :

Rubina Dilaik | मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर लाल बिकीनीत रुबिना दिलैकचा सिझलिंग अवतार, पाहा फोटो…

Shiddat Movie Review : प्रेमकथेवर आधारित चित्रपटात सनी कौशल-राधिका मदनचा दमदार अभिनय, वाचा कसा आहे ‘शिद्दत’?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI