Love Story | हेमा मालिनीच्या प्रेमात आकंठ बुडाले होते धर्मेंद्र, लग्न करण्यासाठी बदलला होता धर्म!

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) आणि अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांची प्रेमकथा एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. दोघांनीही एकमेकांना आपला जोडीदार बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.

Love Story | हेमा मालिनीच्या प्रेमात आकंठ बुडाले होते धर्मेंद्र, लग्न करण्यासाठी बदलला होता धर्म!
धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी

मुंबई : बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) आणि अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांची प्रेमकथा एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. दोघांनीही एकमेकांना आपला जोडीदार बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्यांची दोन्ही कुटुंबे या लग्नाच्या विरोधात होती आणि लोक दोघांच्याही नात्यावर टीका देखील करत होते. कारण धर्मेंद्र आधीच विवाहित होते. तथापि, प्रत्येक समस्येशी लढा देत दोघांनीही त्यांच्या प्रेमाची लढाई जिंकली. इतकेच नाही तर धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता (Dharmendra and Hema Malini iconic love story).

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची पहिली भेट 1970मध्ये झाली होती, जेव्हा ते दोघे ‘तुम हसीन, मैं जवाँ’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी एकत्र होते. या चित्रपटात दोघांची मुख्य भूमिका होती आणि त्यादरम्यान दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले. त्या वेळी धर्मेंद्रचे आधीच लग्न झाले होते. प्रकाश कौर धर्मेंद्र यांच्या पत्नी होत्या आणि दोघांना मुले बॉबी देओल आणि सनी देओल होते.

असे म्हणतात की, त्या काळात हेमा मालिनी यांना लग्नासाठी अनेक प्रस्ताव आले होते. परंतु, अभिनेत्रीने सर्व प्रस्ताव नाकारले. हेमा मालिनी आणि जितेंद्र यांचे देखील लग्न होणार होते. पण ते देखील मोडले.

विवाहित व्यक्तीसोबत नाते नको!

हेमा यांनी धर्मेंद्र यांना आधीच सांगितले होते की, त्यांना विवाहित पुरुषाशी संबंध नको आहेत. तथापि, हृदय कुठे कोणाचे ऐकते आणि या उक्तीला अनुसरून हेमा देखील धर्मेंद्र यांच्या प्रेमात पडल्या. असे म्हणतात की, जेव्हा शोले चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते, तेव्हा धर्मेंद्र लाईट बॉय लाच देऊन लाईट बिघडवायला लावत असत. यामुळे सारखे रिटेक्स होत आणि त्यांना हेमा मालिनी यांना मिठी मारण्याची संधी मिळायची.

जेव्हा शोले रिलीज झाले तेव्हा धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या केमिस्ट्रीने जादू दाखवली. त्यावेळी दोघेही एकमेकांबद्दलच्या नात्याविषयी आणखी गंभीर झाले होते. त्यानंतर 5 वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांनी 1980 साली लग्न केले (Dharmendra and Hema Malini iconic love story.

लग्न करणे सोपे नव्हते!

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना लग्नासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. वास्तविक, धर्मेंद्र आधीच विवाहित होते आणि पत्नीने घटस्फोटास देण्यास नकार दिला. त्याच वेळी हेमा मालिनीचे वडील आणि कुटुंबीय या नात्यावर खुश नव्हते. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, एकदा हेमा मालिनीच्या वडिलांनी धर्मेंद्र यांना घरातून बाहेर ढकलले आणि म्हणाले की, तू माझ्या मुलीच्या आयुष्यातून निघून का जात नाहीस? तू आधीच लग्न केले आहे आणि आता माझ्या मुलीशी लग्न करू शकत नाहीस.

प्रेमासाठी धर्म बदलला

यानंतर धर्मेंद्र यांनी आपला धर्म बदलून हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले  म्हणजेच त्यांनी प्रेमासाठी चक्क इस्लाम धर्म स्वीकारला. हे लग्न काही खास पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडले होते. 1980 मध्ये दोघांचे लग्न झाले होते आणि दोघांना 1981मध्ये पहिली मुलगी ईशा देओल झाली. तर, 4 वर्षानंतर त्यांना ‘अहाना’ झाली. मात्र, नंतर धर्मेंद्र आणि हेमाच्या कुटूंबातील कलह संपुष्टात आला. हेमा एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या की, ‘धर्मेंद्र परिपूर्ण जावई आहेत. कुटुंबातील प्रत्येकजण त्यांच्यावर खूप प्रेम करतो.’

(Dharmendra and Hema Malini iconic love story)

हेही वाचा :

राज ठाकरेंच्या पाठपुराव्याला यश, मुख्यमंत्र्यांकडून राज्यात चित्रीकरणाला तत्त्वत: मान्यता

PHOTO | लीक झालेल्या न्यूड सीनने त्रासलेली राधिका आपटे, व्हिडीओ व्हायरल होताच घरातून बाहेर पडणे झाले होते कठीण!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI