Video : धर्मेंद्र यांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत, चाहतेही म्हणाले व्वा!

Video : धर्मेंद्र यांचा 'तो' व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत, चाहतेही म्हणाले व्वा!

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Feb 27, 2021 | 3:23 PM

मुंबई : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र स्क्रीनपासून दूर गेले आहेत आणि ते आपला वेळ फार्महाऊसमध्ये घालवतात. धर्मेंद्र सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहेत फार्महाऊसवरून वेगवेगळे व्हिडीओ ते आपल्या चाहत्यांसाठी शेअर करतात. (Dharmendra’s video on the farmhouse went viral on social media)

धर्मेंद्र यांनी नुकताच ट्विटरवर फार्महाऊसमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये ते फार्महाऊसवर काम करणाऱ्या कामगारांसोबत गप्पा मारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना धर्मेंद्र यांनी लिहिले आहे की, फार्महाऊसवर काम करताना आम्ही सर्व अशाप्रकारे एन्जॉय करतो. नेहमीच विनम्र राहा आणि तुमच्यामधली माणूसकी जागृत ठेवा.

कोणीच लहान अथवा मोठा नसतो. धर्माची बंधन तोडून एकमेकांना भेटा हे जग खूप सुंदर होईल. सर्वांना प्रेम.’ धर्मेंद्र यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. धर्मेंद्र यांचा या व्हिडीओचे काैतुक देखील करण्यात येत आहे त्यांचा चाहत्यांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.

या काळात धर्मेंद्र त्यांच्या फार्महाऊसवर राहून शेती करत आहेत. याची अनेक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. कधी फार्महहाऊसवर पिकवलेल्या भाज्या तर कधी गायीनं पाडसाला जन्म दिला या सर्व गोष्टी त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केल्या होत्या.

संबंधित बातम्या : 

शाहिद कपूर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार; चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

Photo : हृतिक रोशन क्राईम ब्रँचच्या कार्यालयात, कंगना विरोधात नोंदवणार जबाब!

Video : ‘बिग बॉस 14’ विजेत्या रुबीनाच्या दिलखेचक अदा, सोशल मीडियावर डान्स व्हिडीओची चर्चा!

(Dharmendra’s video on the farmhouse went viral on social media)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें