AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहिद कपूर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार; चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेकांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्यात आले आहेत.

शाहिद कपूर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार; चाहत्यांची उत्सुकता शिगेला!
| Updated on: Feb 27, 2021 | 2:48 PM
Share

मुंबई : बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेकांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्यात आले आहेत. जयललिता आणि इंदिरा गांधी यांच्या नंतर आता आणखी एक चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्यात येणार आहे. या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शाहिद कपूर (Shahid Kapoor)  दिसण्याची शक्यता आहे. (Shahid Kapoor will play The role of Chhatrapati Shivaji Maharaj in upcoming movie)

‘कबीर सिंह’ चित्रपटाचे निर्माते अश्विन वर्दे लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे काम सुरु करणार आहेत. यासाठी त्यांनी साउथ चित्रपटसृष्टीतील लायका प्रोडक्शन या बड्या कंपनीसोबत हातमिळवणी केली आहे. तर चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी शाहिदला विचारणा करण्यात आलीय. शाहिदने यासाठी होकार देखील दिल्याचे कळते आहे.

चित्रपटाचे निर्माते आणि शाहिद कपूरमध्ये चर्चा सुरू असल्याचे कळते आहे. शशांक खेतान निर्देशित आणि धर्मा प्रोडक्शन निर्मित ‘योद्धा’ चित्रपटात शाहिद कपूर दिसणार नसल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. असे म्हटले जात आहे की, स्वत: शाहिद कपूरने हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. शाहिदसोबत दिशा पाटनी या चित्रपटात दिसणार होती. मीडिया रिपोर्टनुसार शाहिद कपूर जर्सीचे शूटिंग पूर्ण होताच या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार होता, पण आता शाहिदनेच चित्रपटास नकार दिला आहे.

संबंधित बातम्या : 

‘द गर्ल ऑन द ट्रेन’ चित्रपटातील परिणीती चोप्राचा अभिनय पाहाच!

Photo : हृतिक रोशन क्राईम ब्रँचच्या कार्यालयात, कंगना विरोधात नोंदवणार जबाब!

Video : ‘बिग बॉस 14’ विजेत्या रुबीनाच्या दिलखेचक अदा, सोशल मीडियावर डान्स व्हिडीओची चर्चा!

(Shahid Kapoor will play The role of Chhatrapati Shivaji Maharaj in upcoming movie)

भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....